शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:53 IST

हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग केला.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी दार तोडले : शेजारी धावल्याने आरोपी पळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगण्यातील एका तरुणीच्या घरात शिरून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला तर, यशोधरानगरात एका ११ वर्षांच्या मुलीला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरमध्येही एका महिलेचा मुंबईतील एका आरोपीने विनयभंग केला.हिंगण्यातील तरुणीने (वय २५) दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ती घरात एकटी झोपलेली असताना शेजारी राहणारे आरोपी दौलत पवार, गणेश पवार आणि भास्कर जाधव यांनी तिला आवाज दिला. तिने दार उघडण्यास नकार दिला असता त्यांनी दाराला लाथ मारून ते तोडले. तरुणीच्या घरात शिरल्यानंतर आरोपी तिच्याशी अतिप्रसंगाचा प्रयत्न करू लागले. तिने विरोध करून आरडाओरड केली असता आरोपीने तिला मारहाण केली. दरम्यान आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी जमली. ते पाहून आरोपी पळून गेले. पीडित तरुणीने हिंगणा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला (वय ३६) गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास तिच्या ११ वर्षीय मुलीला घेऊन दुर्गा उत्सवाच्या महाप्रसादासाठी गेली होती. ती जेवण करीत असताना आरोपी मोनू प्रमोद बाथो (वय २०) याने मुलीला खेळण्यासाठी मोबाईल देण्याचे आमिष दाखवून बाजूला नेले आणि तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. मुलीने आरडाओरड केली असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बालिकेने हा प्रकार आईला सांगितला. आईने यशोधरानगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही १६ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडित महिला तिच्या पतीसह सदरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये राहतात. ते त्यांच्या (केअर टेकर) रूममध्ये झोपून असताना पहाटे ४ च्या सुमारास मुंबईती रहिवासी आरोपी राजेश अय्यर तेथे आला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्याने पतीसह अन्य कर्मचारी धावले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग