शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च ‘टार्गेट’ करणाऱ्या टोळीचा भंडाफोड, पाच गुन्हे उघड

By योगेश पांडे | Updated: July 4, 2023 17:23 IST

१.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : शहरातील विविध भागांमधून केवळ ‘इलेक्ट्रीक वायर’च चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला असून एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्यांनी केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.

७ जून रोजी महाल येथील अश्विन दक्षिणी यांच्या लकडगंज येथील निर्माणाधीन घरातून ८० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक वायर चोरी गेली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना यात योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (२५, कोतवाली, काशीबाई देवळाजवळ) याचा हात असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने कबुली दिली. संतोष शाहू (३८, न्यू बिनाकी, मंगळवारी, कांजी हाऊस चौक) याच्यासोबत मिळून हे गुन्हे केल्याचे त्याने सांगितले.

योगेशला अटक करून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १०० बंडल, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८, नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० बंडल, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४ बंडल चोरल्याची कबुली दिली. आरोपी वायरमधून तांबे गळविण्याची प्रक्रिया करून त्याची विक्री करायचे. पोलिसांनी त्याच्याकडून तशाप्रकारचे १०८ किलो तांबे, दुचाकी, मोबाईल असा १.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. संतोष शाहू फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे, कोरडे, अनिल जैन, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासुद, संतोष चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीnagpurनागपूरArrestअटक