गणेशपेठ डेपोला डिझेल बचतीत द्वितीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:15+5:302021-02-05T04:46:15+5:30
नागपूर : पेट्रोलियम बचत संशोधन संघ व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्यावतीने एसटी महामंडळाच्या गणेशपेठ डेपोची, डिझेल बचतीसाठी दिल्या ...

गणेशपेठ डेपोला डिझेल बचतीत द्वितीय पुरस्कार
नागपूर : पेट्रोलियम बचत संशोधन संघ व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्यावतीने एसटी महामंडळाच्या गणेशपेठ डेपोची, डिझेल बचतीसाठी दिल्या जाणाऱ्या द्वितीय पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. या डेपोने २०१९-२० या वर्षात ८७ हजार लिटर डिझेलची बचत केली आहे. एसटी महामंडळातर्फे डिझेल बचतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत.
पेट्रोलियम बचत संशोधन संघ व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांनी डिझेल बचत करणाऱ्या डेपोंना पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोलापूर डेपोची प्रथम, नागपुरातील गणेशपेठ डेपोची द्वितीय तर, औरंगाबाद डेपोची तृतीय पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम लवकरच होणार आहे. गणेशपेठ डेपोचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी हा पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला व भविष्यात डिझेल बचतीकरिता आणखी जाेमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.