शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

Ganesh Festival : नागपूर मनपाच्या एक खिडकी योजनेचा बोजवारा : गणेशोत्सव मंडळांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:58 IST

गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी होईल असा दावा करीत परवानगीसाठी नागपूर महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र महापालिकेच्या एक खिडकी योजनेचा पार बोजवारा उडाला असून आठ दिवसापूर्वी अर्ज करूनही परवानगीसाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र मंगळवारी लक्ष्मीनगर झोनमध्ये बघायला मिळाले.

ठळक मुद्देआठ दिवसापूर्वी अर्ज करूनही परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घ्यावी लागते. यामुळे होणारा त्रास कमी होईल असा दावा करीत परवानगीसाठी नागपूर महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र महापालिकेच्या एक खिडकी योजनेचा पार बोजवारा उडाला असून आठ दिवसापूर्वी अर्ज करूनही परवानगीसाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र मंगळवारी लक्ष्मीनगर झोनमध्ये बघायला मिळाले. कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती अन्य झोनमध्ये होती.गणेशोत्सवाच्या मंडपासाठी महापालिकेच्या झोनचे सहायक आयुक्त व वाहतूक आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे.आवश्यक सर्व परवानगी या एकाच अ‍ॅपवरुन मिळविता येतील असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र सर्व्हर डाऊ न असल्याने अ‍ॅप डाऊ नलोड होत नव्हते. त्यामुळे अनेक मंडळांना आॅफ लाईन अर्ज करावे लागले. झोन कार्यालयात महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असेल तरच महावितरण व एसएनडीएलकडून वीज जोडणीासाठी अर्ज स्वीकारले जात होते. लक्ष्मीनगर झोन कार्यालयातील एक खिडकी कक्षात पोलीस विभागाचा कर्मचारी वगळता अन्य कोणत्याही विभागाचे अधिकारी मंगळवारी उपस्थित नव्हते. अशीच परिस्थिती महापालिकेच्या अन्य झोन कार्यालयात होती.आठ दिवसापूर्वी अर्ज केला असतानाही परवानगीसाठी मंडळाच्या कार्यक र्त्यांना भटकंती करावी लागत असल्याबाबत शिक्षण समितीचे माजी सभापती गोपाल बोहरे यांनी झोनच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार केली. एक खिडकी कक्षात संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्याने बोहरे यांना ताटकळत बसावे लागले. माजी सभापतींना भटकं ती करावी लागत असेल तर इतरांची काय अवस्था असेल, असा संतप्त सवाल त्यांनी केला.बांधकाम विभागाकडे मंडपासाठी परवानगी घेण्यासाठी पैसे भरल्याशिवाय इतर विभागाकडून परवानगी मिळत नाही. असे असतानाही बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित नव्हते. शनिवार ते सोमवार अशी सलग तीन दिवस कार्यालयाला सुटी असल्याने परवानगी देण्याचे काम बंद होते. गुरुवारी गणरायाचे आगमन होणार असल्याने मंगळवारी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परवानगीसाठी झोन कार्यालयात गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाईगणेशोत्सव मंडळांनी परवानगी न घेता गणेशमूर्ती बसविल्यास उभारण्यात आलेला मंडप अवैध ठरवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. परंतु आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही गुरुवारपूर्वी परवानगी न मिळाल्यास याला गणेश मंडळ जबाबदार कसे? असा प्रश्न उपस्थित करून अर्ज केल्यानंतरही परवानगी न मिळाल्यास संबंधित गणेश मंडळावर कारवाई करू नये, अशी मागणी मंडळांनी केली आहे.कार्यक्षेत्रावरून उपअभियंत्यात वादमहापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यावर मंडळाच्या जागेची पाहणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक प्रभागाची विभागणी करण्यात आली. परंतु संबंधित मंडळाचे क्षेत्र आपल्या अधिकार क्षेत्रात नाही. दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रातील असल्याचे सांगून उपअभियंते परवानगीसाठी टोलवाटोलवी करीत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना हकनाक हेलपाटे मारावे लागत आहे.चोरीची वीज घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाहीएक खिडकी योजनेच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, पोलीस, महावितरण अशा आवश्यक सर्व विभागाच्या परवानगी मिळणे अपेक्षित आहे. परवानगीशिवाय वीज मीटर मिळत नाही. परंतु अर्ज केल्यानंतरही परवानगी न मिळाल्यास मंडळापुढे चोरीची वीज घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी व्यथा मंडळाच्या कार्यक र्त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका