शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Ganesh Chaturthi 2018 : रस्त्यांचे विघ्न ओलांडून सुखकर्त्याचे संत्रानगरीत आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 20:55 IST

शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशासनाला नियोजनाची बुद्धी दिली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून येत्या १० दिवस चैतन्यरुपी सुमनांचा सुगंध पसरवण्यासाठी बाप्पा घरोघरी, सार्वजनिक मंडळात विराजमान झाले.

ठळक मुद्देउत्साहात स्वागत : चितारओळीसह शहरातील मुख्य बाजारपेठेत लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशासनाला नियोजनाची बुद्धी दिली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून येत्या १० दिवस चैतन्यरुपी सुमनांचा सुगंध पसरवण्यासाठी बाप्पा घरोघरी, सार्वजनिक मंडळात विराजमान झाले.गुरुवारी बाप्पाच्या आगमनाने शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील रस्त्यावर, बाजारपेठेत एकच लगबग होती. विदर्भात मूर्ती विक्रीचे प्रसिद्ध ठिकाण असलेली चितारओळ गणेशभक्तांनी सकाळपासूनच खचाखच भरली होती. डोक्यावर फेटे, भगव्या टोप्या, हातात टाळ आणि मुखातून गणरायाचा जयजयकार असे भक्तिमय उत्साहाचे वातावरण येथे अनुभवायला मिळाले. गुलालाची उधळण, ढोल ताशांचे होणारे गजर, त्यावर बेधुंद होऊन थिरकणारी तरुणाई, बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी चिमुकल्यांची लगबग, हा आनंद अनुभवण्यासाठी जमलेले नागपूरकर गणपती बाप्पा मोरया ऽ ऽ ऽ, एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करीत होते. बाजारपेठेचा परिसर उत्साहाने भरून गेला होता. काही बाप्पा वाद्यांच्या मिरवणुकीतून वाजत गाजत, काही मोटारसायकलवर, काही कार, आॅटोत स्वार होत घरोघरी, मंडळाच्या मंडपात, रात्री उशिरापर्यंत विराजमान झाले.शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेतला पोलिसांनी वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन केले होते. गांधीबाग, चितारओळ, महाल, इतवारी, या परिसरात मेट्रोचे काम झपाट्याने सुरू आहे. ४० टक्के रस्ता या कामाने वेढलेला आहे. तरीसुद्धा चितारओळ परिसरात वाहनांची दाटी पोलिसांनी होऊ दिली नाही. रस्त्यावरचे ट्रॅफिक मॅनेजमेंट, डायव्हर्शन पॉर्इंट, पेट्रोलिंग आॅन रोड आणि गर्दी कंट्रोल करण्यासाठी चांगले प्लॅनिंग दिसून आले. येणाºया आणि जाणाºया वाहनांचे एन्ट्री पॉर्इंट फिक्स करण्यात आले होते. मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून, मेट्रोवाल्यांचे सहकार्य घेण्यात आले. वाहतूक पोलिसांबरोबरच तहसील, कोतलवाली ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची मदत घेण्यात आली. वाहतुकीबरोबरच, लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची कुमक परिसरात तैनात होती. काही मंडळांना आदल्या दिवशीच मिरवणुकी काढण्याची विनंती पोलिसांनी केली होती. त्यामुळे परिसरातील वाहनांचा मोठा भार कमी झाला होता. त्यामुळे एरवी होणारे ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, वाहनचालकांचा होत असलेला त्रागा यावेळी पोलिसांच्या यशस्वी नियोजनामुळे झाला नाही.ढोल ताशांचा दमपोलीस विभागाने गणपतीच्या मिरवणुकीत डीजेवर बंदी घातल्याने, चितारओळीसह संपूर्ण शहरात विविध शहरातून बँड पथक पोहचले होते. विदर्भात सर्वात मोठा गणेश उत्सव हा नागपुरात साजरा होता. शहरात १३०० हून अधिक गणेश मंडळ असल्याने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यासाठी हे पथक शहरात वेगवेगळ्या भागात तैनात होते. डीजेवर बंदी आणल्याने या पथकांना गणेश मंडळांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. नागपूरसह अमरावती भागातील बाभुळगाव, धामणगाव, वर्धा, हिंगणघाट, चिमूर, पांढुर्णा येथून मोठ्या संख्येने बँड पथके आली होती. जागोजागी ही पथके ताल धरून वाजवित होती व कुणी आॅर्डर दिला तर त्यांच्या मिरवणुकीत वाजवायला जात होती. त्यांच्या तालासुरातील वाद्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.बाप्पाची आकर्षक रूपेगणपती ही अशी देवता आहे, जी कुठल्याही रूपात आकर्षकच दिसते. त्यामुळे गाजलेल्या सिनेमातील पात्र, देव आणि संतांच्या वेगवेगळ्या रूपात गणराजाला मूर्तिकारांनी घडविले होते. सार्वजनिक मंडळांनी भगवान शंकराच्या वेगवेगळ्या रूपात गणरायाला साकारण्यास पसंती दर्शविली. बालगणेश, शिवाजी महाराज, साईबाबा आणि अष्टविनायक ाचे हुबेहुब रूपात बाप्पा मूर्तिकारांनी घडविले होते.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेधले लक्षआपला गणपती आणि आपले मंडळाचा वेगळेपणा जपण्यासाठी गणेश मंडळांच्या सदस्यांच्या वेशभूषा लक्ष वेधून घेत होत्या. मंडळाच्या नावाचे टी-शर्ट काहींनी छापून घेतले होते. काही मंडळांनी शुभ्र वस्त्र आणि भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. काही मंडळाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत, हातात टाळ घेऊन गणरायाचा गजर करीत होते. या वेशभूषांमुळे बाप्पाच्या मिरवणुकीत वेगळेपण दिसून आले. मंडळातर्फे वेशभूषेबरोबरच, मिरवणुकीसाठी बाप्पाच्या वाहनांचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती.सर्वत्र उत्साह आनंद आणि लगबगबाप्पाच्या आगमनामुळे येत्या दहा दिवस चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह तेवढाच जोशात होता. बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी अख्खे कुटुंब बाजारात आले होते. चितारओळीच्या गर्दीतून गणपतीबरोबर दोन चिमुकल्यांना हातठेल्यावर बसून आई-बाबा ठेला ओढत होते. यावेळी या कुटुंबाच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या स्वागताचे वेगळेच भाव झळकत होते. मंडळाच्या गणपतीच्या सजावटीसाठी कार्यकर्त्यांनी मूर्तिकारांच्या सभोवती गर्दी केली होती. बाप्पाला सजवतानाच्या सेल्फी पटापट टिपल्या जात होत्या. बाप्पाचे घरापर्यंत स्वागत वाजत-गाजत व्हावे म्हणून बाजारपेठेच्या गर्दीतही ढोलताशे दणक्यात गर्जत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. बाप्पाची मुहुर्तावर स्थापना होण्यासाठी खरेदीची लगबग होती.मिरवणुका आणि जयजयकारउत्साह आणि चैतन्य पसरविणाऱ्या गणरायाचे स्वागत जल्लोषात झाले. चितारओळीतून छोटेखाणी मिरवणुका निघाल्याच, पण वस्त्यावस्त्यांमध्ये बाप्पाच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशांचे दणदणाटात गुलालांची उधळण करीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत बाप्पा कुठे बग्गीवर स्वार होते, तर कुठे ट्रेलर आणि ट्रॅक्टरवर. तरुणाईसुद्धा बेफाम होऊन थिरकत होती. तर लहान चिमुकले, महिला पुष्पवर्षाव करीत बाप्पांचा जयजयकार करीत होते. वस्त्यावस्त्यांमध्ये निघालेल्या छोट्याछोट्या मिरवणुकांनी उत्साहाचा माहौल आणखी रंगला होता.ढोल ताशा पथकांचे दमदार सादरीकरणबाप्पाच्या आगमनाचे स्वागत गेल्या काही वर्षांपासून शहरातील शिवसंस्कृती, बेधुंद, गजचक्र ढोल ताशा पथक अतिशय दमदार करतात. बडकस चौक, गांधी पुतळा चौकात त्यांचे सादरीकरण गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. पांढरेशुभ्र वस्त्र, डोक्यावर भगवा फेटा, गळ्यात मोठाले ढोल, हातात भगवा झेंडा आणि मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष एका शिस्तीत, एका तालमीत तरुण- तरुणी बेधुंद होऊन करीत होते. ढोल ताशा पथकांच्या सादरीकरणाने चितारओळ परिसर दुमदुमुन गेला होता. या ढोलताशा पथकांबरोबरच परिसरातील बँण्ड पथकांनीसुद्धा आपल्या पारंपरिक वादनाने बाप्पांचे स्वागत केले. 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८nagpurनागपूर