गांधीवादी प्रेमभावनेने ओतप्रोत भरलेले
By Admin | Updated: July 7, 2014 01:05 IST2014-07-07T01:05:17+5:302014-07-07T01:05:17+5:30
अडचणींच्या काळात मदत करणे हा मानवी धर्म आहे. मित्राला आधार व्हावा यासाठी त्याच्या घरात राहून आर्थिक मदत करणे हे काम केवळ गांधीवादी करू शकतात. गांधीजींच्या विचारांना मानणाऱ्या

गांधीवादी प्रेमभावनेने ओतप्रोत भरलेले
गेव्ह अवारी : अपंगांना कृत्रिम पायांचे वाटप
नागपूर- अडचणींच्या काळात मदत करणे हा मानवी धर्म आहे. मित्राला आधार व्हावा यासाठी त्याच्या घरात राहून आर्थिक मदत करणे हे काम केवळ गांधीवादी करू शकतात. गांधीजींच्या विचारांना मानणाऱ्या व्यक्तींमध्ये एकमेकाबद्दल प्रेमभावना ओतप्रोत भरलेली असते. ही परंपरा नवीन पिढीने शिकणे गरजेचे आहे, असे विचार माजी खासदार गेव्ह अवारी यांनी व्यक्त केले.
जनरल मंचरशा आवारी यांची पुण्यतिथी व सेवादल शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. सुलेमान खान पठाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सेवादल शिक्षण संस्थेच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गरीब होतकरू १२ अंपगांना कृत्रिम पायांचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. सेवादल शिक्षण संस्थेतील १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाच गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन के ले. जनरल आवारी व सुलेमान खान पठाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. सामाजिक कार्य लोकाभिमूख करण्यासाठी व निकोप लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन रुजविणे व स्वतंत्र चळवळीतील योगदानांचे वैचारिक विचार करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत रमेश गिरडकर यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात संस्थेच्यावतीने आणखी १८ अपंगांना कृत्रिम अंगाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला राजे मुधोजी भोसले, केशवराव शेंडे, आमदार ना.गो. गाणार, धनराज कुंभारे, यादवराव देवगडे, डॉ. जस्मिन आवारी, राजू नागुलवार, जयंत मोटघरे, नयना झाडे, पुरुषोत्तम बोरगांवकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)