लंडनच्या मैत्रिणीने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:03+5:302021-02-05T04:49:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लंडनच्या महिलेशी फेसबुकवर मैत्री करणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडले. या महिलेने सदर वृद्धाला ...

Ganda, a friend from London | लंडनच्या मैत्रिणीने घातला गंडा

लंडनच्या मैत्रिणीने घातला गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - लंडनच्या महिलेशी फेसबुकवर मैत्री करणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडले. या महिलेने सदर वृद्धाला भारतात गिफ्ट घेऊन येण्याची आणि नंतर दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी लगेच अडवून धरल्याची थाप मारून वृद्धाकडून ९ लाख, ८५ हजार रुपये उकळले. ऑक्टोबर २०१० मध्ये घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात बजाजनगर पोलिसांनी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अनिल वसंत मुलावकर (वय ६६) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते लक्ष्मीनगरात राहतात. वर्षभरापूर्वी त्यांना कथित लिडा थॉमसन (लंडन) हिची फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. ती ॲक्सेप्ट केल्यानंतर मुलावकर आणि लिडा फेसबुकवर संपर्कात राहू लागले. जून-जुलै २०२० मध्ये कोरोनाचा सर्वत्र झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना तिने आपला कोट्यवधींचा ऐवज घेऊन भारतात सेवाकार्यासाठी येण्याचा प्रस्ताव मांडला. नव्हे, ७ ऑक्टोबर २०२० ला दुपारी ४.३० वाजता तिने दिल्ली एअरपोर्टला उतरल्याचे मुलावकर यांना सांगितले. तेथे लगेच एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी अडविल्याचे नंतर ती म्हणाली. ९ लाख ८५ हजारांची कस्टम ड्युटी जमा केल्याशिवाय आपल्याला कस्टम अधिकारी सोडणार नाही. ही रक्कम जमा केली नाही, तर आपला कोट्यवधींचा ऐवज जप्त केला जाईल, अशीही थाप तिने मारली. तिच्या थापेबाजीला बळी पडून मुलावकर यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत ही रक्कम जमा केली. पुन:पुन्हा रकमेची मागणी होत असल्याने मुलावकर यांनी नकार दिला. त्यानंतर कथित मैत्रिणीने संपर्क तोडून टाकला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

सावधान...।

लोकमतने गेल्या चार दिवसांत सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीचे प्रकार कसे असतात, त्यासंबंधीची वृत्तमालिका प्रकाशित केली. नागरिकांनी कोणत्याही थापेबाजीला किंवा आमिषाला बळी पडू नये, असे उदाहरणासहित त्यात नमूद करण्यात आले आहे.

----

Web Title: Ganda, a friend from London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.