शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात होस्टेलमध्ये सुरू होता जुगार अड्डा : सदर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:00 IST

नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देजुगाऱ्यांकडून २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन मंगळवारीतील एका होस्टेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर पोलिसांनी रविवारी रात्री छापा घालून होस्टेलच्या संचालकासह सहा जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मंगळवारी बाजारात गुप्ता बॉयज होस्टेल आहे. येथे संचालक आकाश गुप्ता अनेक दिवसांपासून जुगार अड्डा चालवतो, अशी माहिती सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तेथे रविवारी रात्री छापा घालण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने होस्टेलमध्ये छापा घालून आरोपी आकाश घनश्याम गुप्ता, रोशन अशोक बनसोडे, मोहम्मद जिमल अजगर अली, किसन अशोक बेंदरे, रोहन रामलखन कनोजिया आणि अजय तुुलसी कनोजिया यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि साहित्यासह २ लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त केला. होस्टेलमध्ये चक्क जुगार अड्डा चालविला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.ही कारवाई परिमंडळ-२ चे उपायुक्त चिन्मय पंडित, ठाणेदार सुनील बोंडे, वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयूर चौरसिया, हवालदार विनोद तिवारी, नायक सुशांत सोळंके, सुधीर मेश्राम, संदीप पांडे, नीलेश शेंदरे आदींनी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड