इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील जुगार अड्डा पकडला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST2021-07-30T04:09:11+5:302021-07-30T04:09:11+5:30

नागपूर : इतवारी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इतवारीच्या दक्षिण बुकिंग कार्यालयाजवळ लोकोशेड परिसरात सुरू असलेल्या जुगार ...

Gambling den caught in railway station area on Sunday () | इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील जुगार अड्डा पकडला ()

इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील जुगार अड्डा पकडला ()

नागपूर : इतवारी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इतवारीच्या दक्षिण बुकिंग कार्यालयाजवळ लोकोशेड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळत असलेल्या चार आरोपींना रंगेहात अटक केली.

फिरोज पटेल (४२), आबिद खान सादत खान (३६), अभय पांडे (३५) आणि शेख शहबाज शफिक (४२) रा. भारतनगर, कळमना मार्केट परिसर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४८ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार इतवारी रेल्वेस्थानकावरील लोहमार्ग पोलिसांना काही असामाजिक तत्व दक्षिण बुकिंगजवळ लोको शेड परिसरात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी चार आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, अविनाश नारनवरे, विजय सुरवडे, सुभाष मडावी, नामदेव सहारे, रोशन अली, इतवारी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक राकेश कुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनाचे प्रधान आरक्षक विवेक कनोजिया यांनी पार पाडली.

..............

Web Title: Gambling den caught in railway station area on Sunday ()