लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.अजनीतील रेल्वे वसाहत किमान १०० वर्षे जुनी आहे. ज्या इमारतीची गॅलरी कोसळली, ती इमारत ३० वर्षांपूर्वी बांधली आहे. ४ मजली इमारतीत १६ क्वॉर्टर्स आहेत. पहिल्या माळ्यावरील ‘सी’ क्वॉर्टरच्या गॅलरीचा भाग पहाटे कोसळला. येथे सहायक लोको पायलट दिनेश मेश्राम राहतात. घटना पहाटे घडली त्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडला नाही. पण हीच गॅलरी दिवसा कोसळली असती तर प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. देशात सर्वाधिक महसूल मिळविणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी गळक्या, पडक्या इमारतीत राहत आहे. या घटनेमुळे क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाचे या कॉलनीच्या देखभालीकडे लक्ष नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. तक्रारी करुनही विभाग लक्ष देत नाहीया कॉलनीतील अनेक क्वॉर्टसचे छळ गळत आहे. गडर लाईन तुंबल्या आहेत, अनेक क्वॉटर्स जीर्ण झाले आहेत. मात्र अनेकदा तक्रारी करूनही त्याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्यांचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कॉलनीच्या देखभालीसाठी आधी कॉलनी केअर कमिटी होती. या कमिटीत रहिवासी, कर्मचारी संघटना व अधिकारी यांचे प्रतिनिधी असायचे. मात्र आता ही कमिटी राहिली नाही. त्यामुळे देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. येथे यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यात कुणाचा जीव गेला नसला तरी काही जण जखमी झाले. वरिष्ठ मंडळ इंजिनिअरला घेरावमंगळवारी दुपारी वरिष्ठ मंडळ इंजिनियर (समन्वय) पवनकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. धोकादायक इमारती आधी दुरुस्त करा तसेच तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर पाटील यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसात काहीच निर्णय न झाल्यास डीआरएम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी एनआरएमयूचे मंडळ सचिव हबीब खान, मंडळ कोषाध्यक्ष नरेंद्र धानफोले, देवाशिष भट्टाचार्य, ई.व्ही. राव, धनसिंग पाटील, अजय रगडे उपस्थित होते.
नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 20:24 IST
पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित क्वॉर्टरमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.
नागपूरच्या अजनी रेल्वे कॉलनीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळली
ठळक मुद्दे३० वर्षे जुने क्वॉर्टर : सुरक्षित क्वॉर्टरमध्ये रहिवाशांना हलविण्याची संघटनेची मागणी