अरुणा सबाने यांच्या रूपाने सांस्कृतिक नेतृत्व लाभले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:19+5:302021-02-05T04:47:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अरुणा सबाने या कृतिशील लेखिका आहेत. त्यांनी शेकडो स्त्रियांना लिहिते केले आणि अनेक साहित्य ...

अरुणा सबाने यांच्या रूपाने सांस्कृतिक नेतृत्व लाभले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अरुणा सबाने या कृतिशील लेखिका आहेत. त्यांनी शेकडो स्त्रियांना लिहिते केले आणि अनेक साहित्य प्रकाशितही केले. त्यांच्या रूपाने नागपूरला सांस्कृतिक नेतृत्व लाभल्याची भावना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिकाद्वारे मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने अरुणा सबाने यांचा सत्कार सोहळा कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे पार पडला. त्यावेळी दाभाडे बोलत होते.
साहित्य आणि समाजकार्यात सतत मग्न असणाऱ्या अरुणा सबाने या आता केवळ नागपूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या गौरव झाल्या आहेत. मराठी लेखक कवी संघटनेच्या वतीने सबाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संघटनेच्या सचिव कीर्ती काळमेघ यांनी केले तर संचालन अरुणा भोंडे यांनी केले. याप्रसंगी सावन धर्मपुरीवार, सुजाता लोखंडे, ज्योती कोहळे, ज्योत्स्ना कदम, वंदना वनकर, अशोक काळे, रेखा घिया उपस्थित होते.