पैशांअभावी भविष्य अंधारात

By Admin | Updated: July 22, 2015 03:17 IST2015-07-22T03:17:47+5:302015-07-22T03:17:47+5:30

गुणवत्ता असतानाही अपेक्षा हतबल : ओपन कॅटेगिरीचा फटका

Futuristic future in the dark of money | पैशांअभावी भविष्य अंधारात

पैशांअभावी भविष्य अंधारात

लोकमत मदतीचा हात
नागपूर : इंजिनीअर बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या अपेक्षा अशोक कोटूरवार या विद्यार्थिनीवर गुणवत्ता असतानाही वंचित राहण्याची वेळ आली आहे. याच अपेक्षाला दहाव्या वर्गात लोकमतच्या आवाहनावर समाजाने मदतीचा हात दिला होता. खडतर परिस्थिती असतानाही गुणवत्तेच्या जोरावर तिने समाजाची अपेक्षा पूर्ण केली. आता स्वप्नांच्या पायथ्याशी पोहोचली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती पुन्हा यशाच्या आड आली आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला पुन्हा समाजाच्या चांगुलपणाची गरज आहे.
अपेक्षाच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. घरचा कर्ता खांदा थकल्याने, आई मेसमध्ये पोळ्याचे काम करून पोटापुरता कुटुंबाचा गाढा ओढते आहे. प्रतापनगरातील एका छोट्याशा खोलीत अपेक्षाचे आजारी वडील व आई उपेक्षेचे जीवन जगत आहे. अशातही अपेक्षाने २०१२ मध्ये १० व्या वर्गात ७८ टक्के गुण मिळविले. त्यावेळी पैशाअभावी तिचे पुढचे शिक्षण अशक्यच असल्याने, लोकमतने समाजापर्यंत तिची व्यथा पोहोचविली. माणुसकीच्या भावनेतून समाज तिच्या मदतीला धावून आला. समाजाच्या पाठबळामुळे अपेक्षाचा स्वप्नांचा प्रवास सुरू झाला.
धरमपेठ पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल ब्रॅँचमध्ये तिने पॉलिटेक्निक यशस्वी केले. ७० टक्के गुण तिने मिळविले. आता तिने इंजिनीअरिंगसाठी फॉर्म भरला आहे. इंजिनीअरिंगला आपला नंबर लागेल, याचा विश्वास तिला आहे. ती ओपन कॅटेगिरीत येत असल्याने इंजिनीअरिंगच्या प्रवेशाचा खर्च १ ते १.२५ लाख रुपयांचा आहे.
घरी एकमेव आई कमावती आहे. तीही केवळ तिघांच्या पोटापुरतीच कमावत असल्याने, इंजिनीअरिींगचा एवढा मोठा खर्च त्यांच्यासाठी डोईजड आहे. (प्रतिनिधी)
अपेक्षाला हवीय आपली साथ
लोकमतच्या आवाहनावर २०१२ मध्ये आपण माणुसकीच्या नात्यातून अपेक्षासाठी धावून आलात. त्यावेळी समाजाने तिच्याबद्दल दाखविलेल्या चांगुलपणाची आजही तिला गरज आहे. आपल्या मदतीमुळे ही गुणवंत मुलगी यशाचे शिखर गाठू शकते. त्यामुळे आपल्या मदतीचा ओघ तिच्यापर्यंत पोहोचू द्या. आपल्याला तिला मदत करायची असेल तर ९३७०८४६५६६ या क्रमांकावर संपर्क साधा.

Web Title: Futuristic future in the dark of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.