प्रकल्पांसाठी निधी मिळणार
By Admin | Updated: July 23, 2014 00:59 IST2014-07-23T00:59:46+5:302014-07-23T00:59:46+5:30
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम)अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध प्र्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही केंद्रीय शहर विकास मंत्री

प्रकल्पांसाठी निधी मिळणार
केंद्रीय शहर विकास मंत्र्यांची ग्वाही : गडकरींच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटले
नागपूर : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम)अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध प्र्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी मंगळवारी दिल्ली येथे दिली. केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महापौर अनिल सोले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर व सत्तापक्ष नेते प्रवीण दटके आदींनी नायडू यांच्याशी शहरातील प्रलंबित प्रकल्पांबाबत चर्चा केली.
महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत. परंतु २०१२ नंतरच्या प्रकल्पांना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत न करण्याचा निर्णय केंद्रीय नगर विकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत.
प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी गडकरी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नायडू यांच्याशी चर्चा क रून निवेदन सादर केले. जेएनएनयूआरएमच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्याची विनंती केली. प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्याची ग्वाही नायडू यांनी दिली. यामुळे शहरातील रखडलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. (प्रतिनिधी)