शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:10 IST

नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.

ठळक मुद्देफॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव : गरजूंपर्यंत पोहचविली राशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. आपल्याकडून ‘फूल नाही फुलाची पाकळी’ मदत व्हावी ही भावना ठेवत मदतीसाठी सरसावले असून यात तरुणांचा सहभाग प्रेरणादायी असा राहिला आहे. हीच भावना जोपासत नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.न्याय वैद्यकशास्त्रच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मालोजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी ११ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळात मदत राशी जमा करण्याचे अभियान राबविले. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून थोडा थोडा निधी जमा केला तसेच शहरातील सीताबर्डी, धरमपेठ, महाल, इतवारी आदी परिसरात फिरून लोकांकडून मदत राशी गोळा केली. या मुलांच्या प्रयत्नातून ७० हजाराचा निधी व इतर साहित्य गोळा करण्यात आले व योग्य नियोजनाद्वारे प्रभावित भागात पूरपीडितांसाठी पाठविण्यात आले. विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.डी. आत्राम, प्रा. संजय ठाकरे व डॉ. वीरेंद्र शेंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या अभियानात विष्णूप्रसाद एन.एम., पूर्वजा गावंडे, अंजली ई.एस., उमेश भोयर, अथुल्या प्रसाद, मीनाक्षी आर.व्ही., दिलीप देव रॉय, नयना टि., दर्शना चापले, पवन चापले, मोनाली पौनीकर, शिवानी गोडके, पवन कल्याण आदी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मालोजी भोसले यांनी सांगितले की, एनएसएसचा उद्देश केवळ कॅम्प आयोजित करणे हाच नाही तर सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा सुद्धा आहे. विद्यार्थ्यांनी जो काही निधी उभारून पूरग्रस्तांसाठी पाठविला, यातून त्यांची सामाजिक भावना जागृत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :floodपूरfundsनिधीStudentविद्यार्थी