अ.भा. नाट्य परिषदेला लवकर सुचलेले शहाणपण! दहा कोटींचा नाट्यकर्मी मदतनिधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:56 PM2020-04-25T17:56:34+5:302020-04-25T17:58:09+5:30

लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि त्यामुळे आगामी काळात रंगकर्मी भरडला जाऊ नये, या हेतूने नाट्यपरिषदेने दहा कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही काळापासून नाट्यपरिषदेच्या निर्णयांचा विचार करता, हे लवकर सुचलेले शहाणपण असे याचे वर्णन करता येईल.

funds of 10 crore by Natya Parishad | अ.भा. नाट्य परिषदेला लवकर सुचलेले शहाणपण! दहा कोटींचा नाट्यकर्मी मदतनिधी उभारणार

अ.भा. नाट्य परिषदेला लवकर सुचलेले शहाणपण! दहा कोटींचा नाट्यकर्मी मदतनिधी उभारणार

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाविदर्भातही रंगकर्मी असतात, याचा विसर पडू नये


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगकर्मींवरही संकट येतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी आपल्यालाही पुढाकार घेऊन रंगकर्मींना आधार द्यावा लागेल, ही जाणिव नाट्यपरिषदेला झालेली दिसते. एव्हाना, नाट्यपरिषद म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या मनमर्जिचा किल्ला, असेच चित्र रंगकर्मींच्या नजरेत आहे. लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि त्यामुळे आगामी काळात रंगकर्मी भरडला जाऊ नये, या हेतूने नाट्यपरिषदेने दहा कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही काळापासून नाट्यपरिषदेच्या निर्णयांचा विचार करता, हे लवकर सुचलेले शहाणपण असे याचे वर्णन करता येईल.
कोरोनामुळे भारताला लॉकडाऊनमध्ये जावे लागले. संसर्गाच्या प्रकोपात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागला आहे आणि त्यातही मुंबई, पुणे आणि नागपूर हे तीन जिल्हे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हे तिनही जिल्हे नाट्यक्षेत्राच्या बाबतीत आघाडीचे आहेत आणि नाट्यविषयक कोणत्याही योजना किंवा आविष्कार साधारणपणे या जिल्ह्यांतूनच इतरत्र पोहोचत असतात. स्वाभाविकच जिल्ह्यांचा नजिकच्या क्षेत्रावर उत्तम प्रभाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे नाट्यकला विविधांगाने विकसित होत आहे. लॉकडाऊनमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच नाट्यक्षेत्रही कुलुपबंद झाले आहे. शासकीय आदेशानुसार नियोजित सगळेच नाट्यप्रयोग १५ मार्चपासूनच रद्द करण्यात आले आहेत आणि पुढचे काही महिने तरी नाट्यगृहांचे कुलुप उघडण्याची शक्यता नाहीच. कोरोनाचे उगमस्थान वुहान, चिन येथे लॉकडाऊन उठल्यावर चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक पोहोचत नसल्याने तेथे पुन्हा चित्रपट व नाट्यगृहे बंद करण्यात आली आहेत. ही स्थिती बघता, लॉकडाऊन उठल्यावर महाराष्ट्रातही नाट्यरसिक सहजासहजी नाट्यगृहांकडे वळणार नाही. याचा अर्थ रंगकर्मी व रंगकमार्शी निगडित सर्व यंत्रणा या काळात मोडकळीस जाण्याची शक्यता आहे. ही स्थिती बघता रंगकर्मींची पालक संस्था असलेल्या अ.भा. मराठी नाट्यपरिषदेने आधार देणे क्रमप्राप्त होते. मात्र, नेहमीप्रमाणे नाट्यपरिषद इकडेही दुर्लक्षच करेल असा कयास होता, तो खोटा ठरला. नाट्यपरिषदेच्या कार्यकारी मंडळाने ऑनलाईन बैठकीत दहा कोटी रुपये गोळा करण्याची घोषणा केली आणि स्वत: ५० लाख रुपये या निधित सादर करत असल्याची घोषणा नाट्यपरिषद अध्यक्षांनी केली. मात्र, हे करताना नेहमीप्रमाणे रंगकर्मींवर पक्षपात होऊ नये, याची काळजी नाट्यपरिषदेकडून घेतली जाणे अपेक्षित आहे. अन्यथा, नाट्यपरिषद म्हणजे केवळ मुंबई असा अट्टहास असणाऱ्या अध्यक्षमहोदयांनी केवळ व्यावसायिक रंगकर्मींचाच विचार करण्याची शक्यता अधिक आहे.

रंगकमार्पासून परावृत्त होण्याची •िाती वेगळीच
: गेल्या महिनाभरात व्यावसायिक नाट्यक्षेत्राला २५ ते ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हौशी रंगकर्मींना बसलेला फटका वेगळाच आहे. आगामी काळात ही नाट्यक्षेत्राला शंभर कोटी रुपयाहून अधिकचा फटका निश्चितच बसणार आहे. तोच सारासार विचार करता नाट्यपरिषदेने नाट्यनिमार्ता, कलावंत, रंगमंच कामगार यांच्यासाठी मदत जाहीर करण्याचा निर्धार केला आणि दहा कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याची घोषणा केली. कलावंत, नाट्यनिमार्ता, रंगमंच कामगारांना या काळात मदत मिळाली नाही तर ते कलावंत, कामगार रोजगारापोटी रंगकमार्पासून कायमचे परावृत्त होण्याची शक्यता आहे.

खऱ्या गरजूंना ओळखावे!
: विदर्भात नाट्यपरिषदेचे उत्तम काम चालते. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम येथे शाखा कार्यरत आहेत. तेव्हा विर्भातल खऱ्या गरजू रंगकर्मींना मदतीसाठी शोधण्याची जबाबदारी याच शाखांवर येते. अन्यथा, घोळ होण्याची शक्यता अधिक असते.

 

 

Web Title: funds of 10 crore by Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.