डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायासाठी धूरफवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:42+5:302021-07-18T04:07:42+5:30

शहरातील विविध भागांत पाहणी : लार्वानिर्मिती होऊ नये यासाठी जनजागृती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात डेंग्यूचे रुग्ण ...

Fumigation for dengue prevention measures | डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायासाठी धूरफवारणी

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायासाठी धूरफवारणी

शहरातील विविध भागांत पाहणी : लार्वानिर्मिती होऊ नये यासाठी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. अन्य साथ आजारांच्या रुग्णांतही वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील दहाही झोनमधील विविध परिसरांत महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या वतीने धूरफवारणी केली जात आहे.

शनिवारी शहरातील विविध भागाांत धूरफवारणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या चमूने परिसरातील घराघरांत जाऊन सर्वेक्षण केले. कूलरमध्ये, टायरमध्ये व अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी केली. ज्यांच्या घरात पाणी साचले आहे, त्यांना याबाबत सूचना देत होणाऱ्या दंडाची माहिती दिली. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.

शनिवारी, लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग ३० मनीष लेआउट, सहकारनगर, नवीन सोनेगाव, इंद्रप्रस्थनगर, पन्नासेक लेआउट, भामटी, भेंडे लेआउट, भाऊसाहेब सुर्वेनगर, त्रिमूर्तीनगर येथे, हनुमाननगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३२ ब अंतर्गत असलेल्या जुने ज्ञानेश्वरनगर, बजरंगनगर, जवाहरनगर, चक्रधरनगर, एनआयटी, उद्यान, शिर्डीनगर, रघुजीनगर येथे, धंतोली झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३३ क, ड अंतर्गत असलेल्या रामेश्वरी, कैलाशनगर, कुंजीलाल पेठनगर, चंद्रनगर येथे धूरफवारणी करण्यात आली. यासोबतच नेहरूनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २६ क, ड अंतर्गत शेषनगर, श्रीकृष्णनगर, शिवणकरनगर, दर्शन कॉलनी, लता मंगेशकरनगर, कामाक्षी सोसायटी, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. १९ क, ड अंतर्गत असलेल्या जलालपुरा, चितारओळी, तीननलचौक, सूत मार्केट, सराफा ओळी, तीननलचौक खापेकर मोहल्ला, लकडगंज झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २५ क, ड अंतर्गत नवीन पारडी, भवानीमाता परिसर, अंबेनगर, स्वागतनगर संपूर्ण परिसर, महाजनपुरा भांडेवाडी, गोंडपुरा आणि मंगळवारी झोनअंतर्गत असलेल्या जाफरनगर, बोरगाव, श्रीकृष्णनगर, गजानननगर, मातानगर, गिऱ्हे लेआउट येथे मनपाच्या वतीने धूरफवारणी करण्यात आली. पुढील १० दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशांनंतर आणि मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग विभागाच्या अधिकारी दीपाली नासरे यांच्या नेतृत्वात धूरफवारणीचा झोननिहाय आणि दिवसनिहाय कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

Web Title: Fumigation for dengue prevention measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.