फरार दाम्पत्य गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:49+5:302021-03-14T04:09:49+5:30
अपहरण करून खंडणी वसूल केल्याच्या २०१६च्या गुन्ह्यात कोर्टाने ३ एप्रिल, २०१८ ला सुनीताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १४ ऑगस्ट, ...

फरार दाम्पत्य गजाआड
अपहरण करून खंडणी वसूल केल्याच्या २०१६च्या गुन्ह्यात कोर्टाने ३ एप्रिल, २०१८ ला सुनीताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १४ ऑगस्ट, २०२० ला ती ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर कारागृहातून बाहेर आली. ठरल्यानुसार, तिला २ नोव्हेंबर, २०२०ला स्वत:हून कारागृहात जायचे होते. मात्र, ती कारागृहात न परतता फरार झाली. तिचा जागोजागी शोध घेऊनही ती आढळली नाही. त्यामुळे सुनीताला फरार घोषित करण्यात आले. वाठोडा पोलीस फरार सुनीताचा शोध घेत असताना दोन दिवसांपूर्वी दीपक आवळे पोलिसांच्या हाती लागला. तोसुद्धा एका गुन्ह्यात फरार होता. त्याला अटक केल्यानंतर त्याने फरार सुनीता कळमेश्वरमध्ये वास्तव्याला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून वाठोडा पोलिसांनी कळमेश्वरला पोहोचून आरोपी सुनीताला अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले.
परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल ताकसांडे यांच्या नेतृत्वात पीएसआय रमेश नन्नावरे, एएसआय बट्टूलाल पांडे, नायक जगन्नाथ घायवट, शिपाई पवन साखरकर, रोहिदास जाधव, मिथुन नाईक, दीपक तऱ्हेकर आणि रेणुका वाकुलकर यांनी ही कामगिरी बजावली.
---