फरार आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:54+5:302021-05-30T04:07:54+5:30
नागपूर : न्यायमंदिरासमोरून १४ वर्षांपूर्वी दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सदर पोलिसांनी शनिवारी अटक केली. अनिल महादेव रामटेककर (वय ४८) असे ...

फरार आरोपी गजाआड
नागपूर : न्यायमंदिरासमोरून १४ वर्षांपूर्वी दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सदर पोलिसांनी शनिवारी अटक केली. अनिल महादेव रामटेककर (वय ४८) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अनिल आणि त्याचा साथीदार दीपक ऊर्फ डवका केसरवानी या दोघांनी २००७ मध्ये न्यायमंदिरासमोरून एक दुचाकी चोरून नेली होती. तेव्हापासून आरोपी अनिल फरार होता.
---
हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
नागपूर : जरीपटक्यात झालेल्या जगदीश मदनेच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी आकाश सदाराम राजपूत (वय २२) याला अखेर जरीपटका पोलिसांनी अटक केली.
९ मेच्या सायंकाळी मदनेची सहा आरोपींनी हत्या केली होती. त्यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून आरोपी आकाश राजपूत फरार होता. तो त्याच्या मामाच्या घरी आल्याची माहिती कळताच आज जरीपटका पोलिसांनी राजपूतला अटक केली.
----