मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा
By Admin | Updated: December 4, 2015 03:23 IST2015-12-04T03:23:17+5:302015-12-04T03:23:17+5:30
मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर नव्हे तर मागास व आर्थिक निकषावर व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देणे गरजेचे आहे.

मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा
आयोगांनी मांडले शासनापुढे समाजाचे विदारक दृश्य
नागपूर : मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर नव्हे तर मागास व आर्थिक निकषावर व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात १५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे विदर्भ विभाग अध्यक्ष अॅड. आसीफ कुरैशी यांनी पत्रपरिषदेत दिली.
अॅड. कुरैशी शासन नेहमीच मुस्लीम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात भागीदारी करण्याची चर्चा करते. शासनाने नेमलेल्या अनेक आयोग व अभ्यासकांच्या समित्यांनी मुस्लीम समाजाच्या मागासलेपणाचे विदारक दृश्य अहवालाच्या माध्यमातून शासनापुढे मांडले आहे. मात्र समाजाची राजकीय क्षेत्रामध्ये होणारी गळचेपी व शासनाच्या दुजाभाव धोरणामुळे मुस्लीम समाज सातत्याने पिछाडला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, गरिबीमुळे हा समाज शिक्षणात मागासला आहे. यावेळी अॅड. फरहद बेग, सय्यद आबीद अली, शहबाद सिद्दीकी, अजीज खान, अशरफ खान, असलमउल्ला, अहमदभाई बुटीबोरी, अहमद नानथ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)