लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजीच्या घरी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेसोबत तिच्या मैत्रिणीच्या वडिलाने वेळोवेळी पाशवी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संतापजनक घटनेला आता वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.मनोज जनार्धन भिसे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तो नंदनवनमध्ये राहतो. त्याच्याच वस्तीत पीडित मुलीच्या आईवडिलांचे घर आहे. तर, आरोपीच्या शेजारी पीडित बालिकेची आजी राहते. मुलीचे आईवडील दिवसभर मोलमजुरीच्या शोधात जात असल्यामुळे पीडित बालिका आजीच्या घरी राहते. आरोपी भिसेची मुलगी आणि पीडित मुलगी मैत्रिणी असल्यामुळे पीडित मुलगी त्याच्या घरी खेळायला जात होती. १९ आॅक्टोबर २०१७ ला त्याने पीडित मुलीला स्वत:च्या घराच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने धाक दाखवल्यामुळे मुलगी गप्प राहिली. परिणामी आरोपी निर्ढावला. त्याने २६ मार्चला दुपारी २ च्या सुमारास पीडित मुलीला पुन्हा आपल्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशीही धमकी दिली. त्यामुळे मुलगी गप्प बसली.दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीची आई आली तेव्हा पीडित मुलीने वेदना होत असल्याचे सांगितले. त्यानंतर या संतापजनक प्रकाराचा खुलासा झाला. मुलीच्या आईने या प्रकरणी रविवारी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३७६ (२) आयएन, ५०६ (ब) तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.पिक्चरचे आमिष दाखवून अश्लील क्लीप दाखवायचाआरोपी भिसे प्लंबर आहे. पीडित मुलीच्या वयाची त्याला दोन मुले आहेत. दिवाळीच्या सुटीत त्याने पहिल्यांदा पीडित मुलीवर अत्याचार केला होता. नंतर दुसऱ्या वेळी त्याने मुलीला पिक्चर दाखवतो म्हणून आपल्या घरात नेऊन मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला आणि अत्याचार केला. अलीकडे मुलगी एकटी दिसताच तो तिला मोबाईलवर अश्लील क्लीप दाखवायचा.
मैत्रिणीचा बाप नराधम : नागपुरात १० वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 19:26 IST
आजीच्या घरी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेसोबत तिच्या मैत्रिणीच्या वडिलाने वेळोवेळी पाशवी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संतापजनक घटनेला आता वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
मैत्रिणीचा बाप नराधम : नागपुरात १० वर्षीय बालिकेवर पाशवी अत्याचार
ठळक मुद्देनंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा, आरोपी गजाआड