शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनीच केला तरुणाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:26 IST

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली.

ठळक मुद्देनागपुरातील काटोल नाक्याजवळची घटना : बाईक हिसकावल्यामुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचा त्याच्या मित्रांनीच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री गिट्टीखदान परिसरातील काटोल नाक्याजवळ घडली. अंकित तिवारी रा. एमआयडीसी राजीवनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल गयाप्रसाद डेहरवाल (१९), सुनील ईश्वरी डेहरवाल (२१) दोन्ही रा. खडगाव रोड भीमनगर आणि राहुल सियाराम डेहरवाल (१९) रा. कळमना अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रानुसार मृत अंकित आणि आरोपी हे मूळचे मध्य प्रदेशातील विनी येथील रहिवासी आहेत. ते सर्व वाडीतील एका पेट्रोल पंपावर काम करीत होते. तिथे अंकित आरोपींना बळजबरीने मारहाण करायचा. त्यांना घाबरवायचा. बुधवारी अंकितने त्याच्या एका मित्राची बाईकही बळजबरीने हिसकावून घेतली होती. त्यामुळे त्यांचा अंकितसोबत वादही झाला होता. यानंतर आरोपींनी अंकितचा काटा काढण्याचे ठरविले. आरोपींनी त्याला बुधवरी रात्री काटोल रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी बोलावले. ढाब्यावर जेवण केल्यानंतर त्यांनी अंकितसोबत बाईक हिसकावल्याच्या घटनेवरून पुन्हा वाद केला. या वादात त्यांनी निर्जन स्थळ पाहून अंकितच्या डोक्यावर रॉडने वार केला. यानंतर त्याच्या डोक्यावर दगडांनी वार करून त्याला संपविले. पहाटे ३.३० वाजता काटोल रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. यापैकी एकाने गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. गुरुवारी सकाळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर