शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:47 IST

वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अ‍ॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अभियंत्यांची चमू एमआरओमध्ये येत आहे.

ठळक मुद्दे वादळामुळे क्षतिग्रस्त इंडिगोचे विमान : ‘एआयईएसएल’ला आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वादळामुळे क्षतिग्रस्त झालेल्या इंडिगो एअरलाईन्स विमानाच्या दुरुस्तीसाठी एअर इंडिया एमआरओमध्ये (मेंटनन्स, रिपेअर अ‍ॅण्ड ओव्हरआॅल) फ्रान्सची चमू येणार आहे. एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसह पहिल्यांच दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या दुरुस्तीसाठी विदेशी अभियंत्यांची चमू एमआरओमध्ये येत आहे.इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान एटीआर-७२ आहे. टर्बो प्रॉप इंजिनचे विमान २६ मे रोजी वादळामुळे क्षतिग्रस्त झाले. विमानाचे डावे विंग नादुरुस्त झाले आहे. याच कारणामुळे हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अ‍ॅप्रॉनमध्ये उभे आहे. मिहान येथील एमआरओमध्ये या विमानाच्या दुरुस्तीसाठी युरोपियन अभियंत्यांच्या चमूला एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची (एआयईएसएल) चमू सहकार्य करणार आहे. विमान १६ जुलैला एमआरओमध्ये आणण्यात येणार असून दुरुस्तीसाठी फ्रान्सची चमू १८ जुलैला नागपुरात पोहोचत आहे. दुरुस्तीचे काम एक महिना चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीएमआरओमध्ये नवीन कंपनीची भरएमआरओचे संचालन करणारी कंपनी एआयईएएलच्या सूत्रांनुसार दुसºया कंपनीचे विमान पहिल्यांदा एमआरओमध्ये येत आहे. एवढेच नव्हे तर विदेशी चमूही दुरुस्तीसाठी येत आहे. एमआरओमध्ये विमानाच्या दुरुस्तीसाठी हँगर देण्यात येणार आहे. यामुळे एआयईएसएलला विमानाच्या पार्किंगमुळे आवक होणार आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूर