शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा
By Admin | Updated: December 15, 2015 05:18 IST2015-12-15T05:18:48+5:302015-12-15T05:18:48+5:30
राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा
नागपूर : राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी सोमवारी विधानभवनावर धडक दिली. या मोर्चाने सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून मार्गक्रमण केले. यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास मोर्चा मॉरिस कॉलेज, टी-पॉर्इंट येथे धडकला. येथे शिक्षक नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या मंत्र्यांना निवेदन सादर करू न मोर्चाची समाप्ती करण्यात आली.
नेतृत्व : ४मधुकर काठोळे, देवीदास बस्वदे, बाळासाहेब काळे, प्रसाद पाटील, भरत रसाळे, दत्तात्रय सावंत, श्रीराम परबत, राजाराम वरू टे, काशीनाथ भोईर, कालिदास माने, चिंतामण वेखंडे व राजेश गवरे यांनी केले.
मागण्या :
४स्व. विजय नकाशे यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत देऊन, त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर विनाअट नोकरीत सामावून घेण्यात यावे.
४१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
४नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळेतील शिक्षकांचे १०० टक्के वेतन शासनाकडून देण्यात यावे.
४शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यात यावे.
४शालेय पोषण आहार योजना शासन निर्णयानुसार अन्य यंत्रणेकडे सोपविण्यात यावी.
४खासगी शाळा शिक्षकांच्या संच मान्यता त्वरित मिळाव्यात व मूल्यांकनास पात्र व टप्प्प्यावरील शाळांना तात्काळ अनुदान मिळावे.
४केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची १०० टक्के पदे प्राथमिक शिक्षकांतून भरण्यात यावी.
४शालार्थ प्रणालीनुसार तयार होणारी पगार बिले तालुका स्तरावर तयार करू न १ तारखेला नियमित पगार करण्यात यावेत.