इंदोरा बुद्ध विहारतर्फे मोफत ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:30+5:302021-05-27T04:08:30+5:30

इंदोरा बुद्ध विहारच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. इंदोरा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई ...

Free Oxygen Cylinder by Indora Buddha Vihar | इंदोरा बुद्ध विहारतर्फे मोफत ऑक्सिजन सिलिंडर

इंदोरा बुद्ध विहारतर्फे मोफत ऑक्सिजन सिलिंडर

इंदोरा बुद्ध विहारच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. इंदोरा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर सेवेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव अमित गडपाले, नितीन गणवीर, संदीप कोचे, राजेश ढोक, जगन तायडे, राहुल डाेंगरे, मुकेश उके आदी उपस्थित होते.

--------------

वंचित बहुजन आघाडीतर्फे भोजनदान ()

वंचित बहुजन व युवा आघाडीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या पर्वावर राणी दुर्गावती चौक येथील पक्ष कार्यालयासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी भोजनदान करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, मुरलीधर मेश्राम, विलास वाटकर, अजय सहारे, मिलिंद मेश्राम, कल्याण अडकीने, रोहित वंजारी, आनंद चवरे, गोवर्धन भेले, प्रशांत नारनवरे, प्रवीण पाटील, वर्षा धारगावे, प्रतीक वंजारी, आनंद बागडे, धम्मदीप लोखंडे, ॲड. प्रवीण सोनटक्के, भरत लांडगे, खालिद अन्सारी, मो. फाजील, मो. अख्तर, खालिद अख्तर, नितेश सवाईकर, अथांग कोरोडे, संघपाल गाडेकर, विनीत मेश्राम, आनंद लांजेवार, अतुल गजभिये, गौतम भिडे, मनिष खोब्रागडे, हरिश बागडे, आर.के. शेंडे, अनिकेत मेश्राम, हर्ष कोचे, यशोधरा रामटेके, रेखा वानखेडे, दिव्या वानखेडे, प्रसेनजित गजभिये, गणेश ढोणे, जितू गजभिये, अनिकेत वंजारी, शुभम वंजारी, आशिष गजघाटे, सोनू बागडे आदी उपस्थित होते.

---------------

ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना ()

वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना पार पडली. या वेळी ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भिक्खू संघाला कठीण चिवरदान व भोजनदान करण्यात आले. कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ते ड्रॅगन पॅलेसपर्यंत शांतीमार्च काढण्यात आले. या वेळी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, नवी दिल्लीचे सदस्य अशोक मेंढे उपस्थित होते. सामूहिक ध्यान सभेच्या कार्यक्रमात गोयंका गुरुजी यांचे प्रवचन झाले. या वेळी वीरेंद्र शाहू, अजय कदम, नगरसेविका सावला शिंगाडे, दीपक सिरिया, नगरसेवक चंदू लांजेवार, दिनेश स्वामी, उदास बंसोड, दीपंकर गणवीर, सुभाष सोमकुवर, अफजल अन्सारी, विष्णू ठवरे, अश्फाक कुरेशी, अंकुश बांबोर्डे, गणेश सेंगर, राजेश गजभिये, विनोद जुमडे, मनोहर गणवीर, विजय अलोने, मनिष डोंगरे, मनिष मेंढे, शरद राहाटे, नरेंद्र चव्हाण, रेखा भावे, रजनी लिंगायत, सागर भावे, विनय बांबोर्डे, सुनील वानखेडे, सचिन नेवारे, प्रवीण नगरकर, चंदू कापसे, भीमराव आळे, महेंद्र मेंढे, नरेंद्र बावनकुळे उपस्थित होते.

----------------

Web Title: Free Oxygen Cylinder by Indora Buddha Vihar