मानकापूर येथे मोफत आरोग्य शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:35+5:302021-09-14T04:12:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुजन विचार मंचतर्फे मानकापूर येथील गाडगेबाबा सोसायटी, समाज भवन येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे ...

Free Health Camp at Mankapur () | मानकापूर येथे मोफत आरोग्य शिबिर ()

मानकापूर येथे मोफत आरोग्य शिबिर ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहुजन विचार मंचतर्फे मानकापूर येथील गाडगेबाबा सोसायटी, समाज भवन येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामान्यांना उपचार मिळावे यासाठी बहुजन विचार मंचचे संस्थापक नरेंद्र जिचकार यांच्या सहकार्याने अभय राऊत यांनी या शिबिराचे आयोजन केले. यामध्ये रक्त तपासणी, शुगर, ब्लडप्रेशर, डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. गरजूंनी मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.

शिबिराचे उद्घाटन नरेंद्र जिचकार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगसेवक किशोर जिचकार, जगदीश दुपारे, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक धोटे, घनश्याम मांगे ॲड. विपीन राऊत, सुमित पांडे, जावेद खान, प्रकाश वानखेडे, सुखदेव मनोहरे, इंद्रसेन ठाकूर, नॅश अली, सादिक अहमद, शैलेश मिश्रा, सलिम खान, रफिक शेख, सुशील साखरे, शारदा बारिया, नंदा भगत, सविता गजभिये, वर्ष सावरकर, हिना वैद्य, कांता लेलेकर, चिंटू गजभिये, खुशी बनवते, विजय हरिणखेडे, मनीष फुलझेले, अनुराग राऊत, गीता करणे, आस्था राऊत आदी उपस्थित होते. अभय राऊत यांनी आभार मानले.

Web Title: Free Health Camp at Mankapur ()