नागपूर ग्रामीण भागात शिवभोजन थाळीचे होणार नि:शुल्क वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:46+5:302021-04-17T04:07:46+5:30
सध्या नागपूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण २४ शिवभोजन केंद्र असून दररोज एकूण २,२७५ लाभार्थी लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या ...

नागपूर ग्रामीण भागात शिवभोजन थाळीचे होणार नि:शुल्क वितरण
सध्या नागपूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण २४ शिवभोजन केंद्र असून दररोज एकूण २,२७५ लाभार्थी लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करून शिवभोजन केंद्रातून दुपारी ११ ते ४ या कालावधीत पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासन निर्देशानुसार शिवभोजन केंद्राच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीड पट वाढ करण्यात आली आहे. या वेळेत कोणीही शिवभोजनाविना परत जाणार नाही तसेच कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद ठेवता येणार नाही.
केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे, ग्राहकांनी व केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर करावा, शारीरिक अंतराचे पालन करावे व साबणाने वेळोवेळी हात धुवावे. कोविड त्रिसूत्रीचे पालन करून शिवभोजन थाळीचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.