अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश
By Admin | Updated: May 19, 2016 02:55 IST2016-05-19T02:55:44+5:302016-05-19T02:55:44+5:30
अनुसूचित जाती-जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी ‘इग्नू’तर्फे

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश
‘इग्नू’चा उपक्रम : शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यावर भर
नागपूर : अनुसूचित जाती-जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी ‘इग्नू’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) पुढाकार घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना ‘इग्नू’तर्फे मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली असून त्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरुप यांनी ही माहिती दिली.
दुर्गम भागात राहणारे आणि ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचू शकत नाही अशा समाजाल शिक्षित करणे यावर ‘इग्नू’च्या वतीने नेहमीच भर देण्यात येतो देशातील अनुसूचित जमातीमध्ये ३० टक्के तर अनुसूचित जमातीमध्ये १८ टक्के अशिक्षिततेचे प्रमाण आहे. इतर समाजाचा विचार करता या दोन्ही जमातींमधील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या दोन्ही समाजातील मुलांनी विविध कारणांनी अध्यार्तून शिक्षण सोडलेले असते. तर काहींना शिक्षणाच्या संधीही उपलब्ध झालेल्या नसतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविणे ही काळाची गरज आहे, डॉ.शिवस्वरुप यांनी प्रतिपादन केले.
अभ्यासक्रमामध्ये बीए. बीकॉम, बीएसस्सी, बीएसडब्लू आणि बीसीए यांचा समावेश आहे. या सहा प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन अनुसूचित जाती आणि जमातीमधील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकतात. या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नसल्याचे शिवस्वरूप यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. श्याम कोरेती उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आॅनलाईन’ प्रवेशाला सुरुवात
जुलै २०१६ पासून नवीन शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. ही प्रवेश परीक्षा विविध अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. इग्नूच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश अर्जासह, प्रवेश शुल्क भरण्याची सोयही करण्यात आली आहे.