शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

कामगारांना ९० दिवस काम केल्याचे दाखवून फसवणूक, बनावट प्रमाणपत्राच्या 'रॅकेट'चा भंडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:32 IST

Nagpur : इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर करायचे अपलोडिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगारांना ९० दिवस काम केल्याचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एका तथाकथित स्वयंसेवी संस्थाचालकाकडून हा प्रकार सुरू होता. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

अजयकुमार नाखले (शांती अपार्टमेंट, लोहार समाज भवनाच्या मागे) असे आरोपीचे नाव असून तो राष्ट्र संघर्ष गवंडी कामगार संघटना चालवत होता. या नावाखाली त्याने गोरखधंदा थाटला होता. कामगार विभागातील दुकाने निरीक्षक रिना पोराटे यांनी तक्रार केली आहे. अशा प्रकरणांच्या तपासणीसाठी शासनाने दक्षता पथक स्थापन केले आहे. १० जुलै रोजी अपर कामगार आयुक्तांना या गोरखधंद्याबाबत माहिती मिळाली. अजयकुमार नाखले हा कार्यालयातून बनावट प्रमाणपत्र तयार करून, ती इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करत होता. त्याबदल्यात तो कामगारांकडून पैसे उकळत होता.

सदर माहितीच्या आधारे डेटा दक्षता पथकाने नाखलेच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान त्याठिकाणी ५१ बोगस बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. या ५१ प्रमाणपत्रांपैकी ४६ प्रमाणपत्रे कळमेश्वरमधील ग्रामपंचायत मोहगाव (सा.) व वडगाव (गुजर) यांच्या नावाने दिसून आली; परंतु सखोल चौकशीत ती प्रमाणपत्रे निर्गमित झालेली नसून पूर्णतः बनावट असल्याचे संबंधित ग्रामपंचायतींनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे.

प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्के वापरण्यात आले होते. तसेच कामगारांची प्रत्यक्ष कामगिरी किंवा उपस्थिती दर्शविणारे कोणतेही खरे पुरावे नव्हते. पोलिसांना तेथे काही प्रमाणपत्रे कोऱ्या स्वरूपातही आढळली. त्यांचा गैरवापर करून भविष्यात फसवणूक केली जाणार होती.

सरकारी निधीचा अपहारआरोपीने सरकारी यंत्रणेची दिशाभूल होऊन सरकारी निधीचा अपहार केला असल्याची बाब समोर आली. या प्रकरणात अजयकुमार नाखले हा फसवणूक करून बोगस दस्तऐवज तयार करणे, त्याचा वापर करणे आणि सामान्य जनतेकडून अवैधरीत्या पैसे उकळणे या गंभीर स्वरूपाच्या अपराधांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी