नाेकरीच्या नावावर महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:57+5:302021-02-15T04:08:57+5:30

सावनेर : वेगवेगळ्या ठिकाणी नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह इतरांची १ लाख ६२ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही ...

Fraud of a woman in the name of Nakeri | नाेकरीच्या नावावर महिलेची फसवणूक

नाेकरीच्या नावावर महिलेची फसवणूक

सावनेर : वेगवेगळ्या ठिकाणी नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह इतरांची १ लाख ६२ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना सावनेर शहरात घडली.

करण माणिक घाटाेळ, रा. नागपूर असे आराेपीचे नाव आहे. त्याने बेबीनंदा मेघराज बजभिये (४२, रा. भाेंगाडे ले-आऊट, सावनेर) यांच्यासह इतरांना सुरक्षा दलात सुपरवायझरची नाेकरी मिळवून देण्याची बतावणी केली. त्यासाठी त्याने बेबीनंदा यांच्यासह इतरांना पैशाची मागणी केली. नाेकरीची गरज असल्याने त्या सर्वांनी करणला एकूण १ लाख ६२ हजार रुपये दिले. रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्याने कुणालाही नाेकरी मिळवून दिली नाही. त्यामुळे त्यांनी करणकडे तगादा लावायला सुरुवात केली. त्यामुळे त्याने त्यांच्याशी संपर्क करणेही टाळले. परिणामी, बेबीनंदा यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ४२० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक मांढरे करीत आहेत.

Web Title: Fraud of a woman in the name of Nakeri