शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पती ऐवजी प्रियकराला लावला जीव, त्यानेही केली नाही तिची कीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 16:52 IST

सुखी संसार सुरू असताना तिचे दुसऱ्याशी सुत जुळले. तिने पतीला सोडले व प्रियकरासोबत संसाराची स्वप्न पाहू लागली. प्रियकराने मात्र, लग्नाचे आमीष दाखवून तिचे शोषण केले व नंतर तो मी नव्हेचची भूमिका घेऊन तिला वाऱ्यावर सोडले.

ठळक मुद्देशारिरीक शोषण करुन सोडले वाऱ्यावर

नागपूर : सुखाचा संसार सुरू होता. मुलगाही पाच वर्षांचा झाला. परंतु तरीसुद्धा एका ३० वर्षाच्या महिलेचे एका व्यक्तीसोबत सुत जुळले. अन् पतीला सोडून ती प्रियकराच्या प्रेमात आकंठ बुडाली. तिला लग्नाचे आमीष दाखवून त्याने वेळोवेळी तिचे शारिरीक शोषण केले. नंतर तो मी नव्हेचची भूमिका घेऊन तिला वाऱ्यावर सोडले. तिच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुनिता (बदललेले) नाव एका इन्शुरन्स कंपनीत काम करीत होती. घरात पती आणि पाच वर्षांचा मुलगा असा तिचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काम करीत असताना आरोपी अभय सुरेश जैस्वाल (२८) रा. राजेंद्रनगर, गल्ली नं. १७, नंदनवन झोपडपट्टी याचेशी तिची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला. परंतु आरोपी अभयने तिला पतीला सोडून देण्यास सांगितले. दरम्यान तिने पतीला टाळण्यास सुरुवात केली.

पतीपासून विभक्त होऊन ती मुलासोबत राहु लागली. दरम्यान आरोपी अभयने वेळोवेळी तिचे शारिरीक शोषण केले. दिघोरी येथे एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सुनिताने आरोपी अभयला लग्न करण्याबाबत दबाब टाकला. परंतु आरोपी लग्नासाठी टाळाटाळ करीत होता. तो लग्न करीत नसल्याचे पाहून सुनिताने वाठोडा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण