शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

नागपुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:19 IST

एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून शहरातील एका सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक यांना सायबर गुन्हेगारांनी ६ लाख ४१ हजार रुपयाचा चुना लावला.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांनी लावला चुना : एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून ६.४१ लाख उडवले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून शहरातील एका सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक यांना सायबर गुन्हेगारांनी ६ लाख ४१ हजार रुपयाचा चुना लावला. अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.दिलीप बळीराम दुपारे (६६) रा. बॅनर्जी ले-आऊट भगवाननगर असे पीडित सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. दुपारे हे वायरलेस शाखेतून पीएसआय पदावरून सेवानिवृत्त झाले. स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये त्यांचे बचत खाते आहे. त्यांची सेवानिवृत्तीची रक्कम याच खात्यात जमा होती. पोलीस सूत्रानुसार २५ मार्च रोजी दुपारे यांना ९१८२४०९२९१८६ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो एसबीआयचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. दुपारे यांचे एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून ते पूर्ववत करण्यासाठी आवश्यक माहिती विचारली. दुपारे यांना बोलण्यात गुंतवून त्याने पीन नंबरसह एटीएमशी संबंधित सर्व माहिती मिळवली. यानंतर काहीच वेळात आरोपीने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दुपारे यांच्या खात्यातून रुपये ट्रान्सफर केले. त्याने वेगवेगळी रक्कम काढून १० ते १२ खात्यांमध्ये ती जमा केली. दरम्यान दुपारे यांना मोबाईलवर पैसे काढण्यात आल्याचे एसएमएस सुद्धा आले. ते पाहिल्यावर दुपारे यांनी आरोपीला फोनसुद्धा केला परंतु त्याने ‘सिस्टीम अपडेट’ होत असल्याचे सांगून दुपारे यांना शांत राहण्यास सांगितले. येत्या २४ तासात अशाप्रकारचे एसएमएस येत राहतील, चिंता करू नका, असे सांगितले. दुपारे यांना तेव्हा काहीच समजले नाही. बँकेत जाऊन विचारपूस करावी असेही त्यांच्या मनात आले, परंतु सुटी असल्याने ते काही करू शकले नाही. या दरम्यान त्यांच्या खात्यातून आरोपीने ६ लाख ४१ हजार रुपये उडवले. यानंतर बँकेत गेल्यावर दुपारे यांना त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.सायबर गुन्हेगारांची दहशतया प्रकरण सायबर गुन्हेगारांची दिल्ली किंवा पश्चिम बंगाल येथील टोळी सहभागी असल्याचा संशय आहे. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यातूनही त्याबाबत संकेत मिळतात. ही टोळी फसवणुकीसाठी दुसऱ्यांच्या खात्यांचा वापर करते. शहरात अशा घटना दररोजच्या झाल्या आहेत. यामुळे सायबर गुन्हेगारांची दहशत पसरली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर