मंत्र्यांच्या नावावर फसवणूक

By Admin | Updated: February 6, 2017 02:03 IST2017-02-06T02:03:29+5:302017-02-06T02:03:29+5:30

मंत्र्यांशी सलगी असल्याची बतावणी करून एका आरोपीने दोघांना काम करण्याचे आमिष दाखवून २६ हजार रुपये उकळले.

Fraud in the name of ministers | मंत्र्यांच्या नावावर फसवणूक

मंत्र्यांच्या नावावर फसवणूक

नागपूर : मंत्र्यांशी सलगी असल्याची बतावणी करून एका आरोपीने दोघांना काम करण्याचे आमिष दाखवून २६ हजार रुपये उकळले. भूषण मधुकर देशमुख (रा. नरेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी भूषण देशमुख हा अनेकांकडे वेगवेगळ्या थापा मारतो. आपली मंत्रालयात अनेकांशी ओळखी आहे, असे सांगून त्याने उंटखान्यातील सहर्ष लालजी जांभुळे (वय २७) यांना टीव्ही अ‍ॅड कंपनीचे रजिस्ट्रेशन करून देतो, अशी बतावणी केली. त्या बदल्यात आरोपी देशमुखने जांभुळेकडून ४ जानेवारीला ३६ हजार रुपये घेतले. त्यानंतर जांभुळेचा मित्र मनीष रेवतकर याला कोर्टाचे काम करून देतो, असे सांगून त्याच्याकडून १० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने दोघांचेही काम करून दिले नाही आणि टाळाटाळ करू लागला. जांभुळेने तगादा लावल्यानंतर त्याला २० हजार रुपये परत केले. त्यांचे उर्वरित १६ हजार आणि रेवतकरचे १० हजार रुपये मात्र परत केले नाही. त्यामुळे या दोघांनी इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर देशमुखविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Fraud in the name of ministers