शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:23+5:302021-03-29T04:07:23+5:30
नागपूर : जुनी कामठी परिसरातील एका प्लाॅट डेव्हलपर्सने शेअर बाजारात गुंतवणूक करून अधिक कमाई करण्याच्या नावाखाली एका नागरिकाचे एक ...

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक
नागपूर : जुनी कामठी परिसरातील एका प्लाॅट डेव्हलपर्सने शेअर बाजारात गुंतवणूक करून अधिक कमाई करण्याच्या नावाखाली एका नागरिकाचे एक लाख रुपये लंपास केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. आराेपीचे नाव मो. इरशाद रहमान सिद्दिकी (३५) असे आहे. माे. इरशादचा प्लाॅट विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने जानेवारी २०१७ मध्ये माे. मुश्ताक नामक व्यक्तीला शेअर खरेदी करून तीन वर्षात अधिक कमाई करण्याचे आमिष दाखवले. मुश्ताक यांनी १३ जानेवारी २०१७ मध्ये इरशादकडून एक लाखाचे शेअर खरेदी केले. दिलेली मुदत संपल्यानंतर मुश्ताक यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. मात्र आराेपीने टाळाटाळ करणे सुरू केले. काही दिवसांनंतर त्याने एक चेक दिला पण ताे बाऊंस झाला. दुसऱ्यांदा पैसे मागण्यास गेल्यानंतर आराेपीने शिवीगाळ करून धमकावले. त्यामुळे मुश्ताक यांनी जुनी कामठी पाेलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दाखल केली. पाेलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.