शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:34 IST

महिला प्रशिक्षणाच्या नावावर 'सामाजिक' फसवणूक : २२७ पैकी १७४ मशीन गायब!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलांना प्रशिक्षण देण्याच्या आणि मशीन पुरवण्याच्या नावाखाली जवळपास ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यात पुण्यातील एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवेदिता अमोल नाहर (अग्रवाल गोडाऊन, शिवडी इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे) आणि उमेश रॉय जाधव (इचलकरंजी) अशी आरोपींची नावे आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळातर्फे महिलांना वस्त्र व्यवसायाबाबत माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते.

महामंडळाचे केंद्र कोराडी येथील जगदंबा मंदिर परिसराजवळ नियोजनानुसार गारमेंट सेंटरमध्ये २०० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार होते. शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण देण्याचे काम पुण्यातील सोशल बफरची संचालिका निवेदिता नाहरला देण्यात आले होते. त्यासाठी शासनाने २२७मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. संबंधित साहित्य इचलकरंजी येथील वरद एंटरप्रायझेसकडून घेण्याचे निश्चित झाले होते. २९ फेब्रुवारी २०२९ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत निवेदिताने वरद एन्टरप्रायझेसचा मालक उमेश रॉय जाधवशी संगनमत करून २२७पैकी १७४ मशीनची अफरातफर केली. त्यांची किंमत ८७.८५ लाख इतकी होती. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता आरोपींनी अफरातफर केल्याची बाब समोर आली. 

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजीwomen and child developmentमहिला आणि बालविकास