जमिनीच्या विक्रीत केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:27+5:302021-08-21T04:12:27+5:30

नागपूर : एक जमीन दोघांना विकून फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कमल शामराव खंगारले (६८), ...

Fraud committed in the sale of land | जमिनीच्या विक्रीत केली फसवणूक

जमिनीच्या विक्रीत केली फसवणूक

नागपूर : एक जमीन दोघांना विकून फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कमल शामराव खंगारले (६८), राजेश शामलाल खंगारले (४०), बेबीबाई किशोर खंगारले (५०) आणि हेमराज खंगारले (५०) रा. नांदा कोराडी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी इकबाल हुसेन रा. टेका यांच्याकडून ३२ लाख रु. एकर या दराने कोराडीतील एका जमिनीचा सौदा केला. राजेश खंगारले याने इकबाल हुसैनसोबत करार केला. करारानुसार इकबालने जय दुर्गा नगरीवर ले-आऊट तयार केले. या ले-आऊटमधील प्लॉट वीरेंद्रप्रताप शर्मा (५०) रा. लघुवेतन कॉलनी यांना १९.२० लाखात विकला. आरोपींनी शर्मा आणि त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेले प्लॉट आणि उर्वरीत जमीन मनोज चुन्नीलाल ठाकूर तसेच हेमलता मनोज ठाकूर यांना ऑक्टोबर २०२० मध्ये ६५ लाखात विकली. त्याची माहिती मिळताच वीरेंद्रप्रताप शर्मा यांनी कोराडी ठाण्यात तक्रार दाखल केली. कोराडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

.............

Web Title: Fraud committed in the sale of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.