कळमेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST2021-08-19T04:11:10+5:302021-08-19T04:11:10+5:30

कळमेश्वर : गृहनिर्माण संस्थेतील भूखंड विक्रीत हेरफेर केल्याप्रकरणी कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरडवार यांच्याविरोधात कळमेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा ...

Fraud case against former mayor of Kalmeshwar | कळमेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

कळमेश्वरच्या माजी नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

कळमेश्वर : गृहनिर्माण संस्थेतील भूखंड विक्रीत हेरफेर केल्याप्रकरणी कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मरडवार यांच्याविरोधात कळमेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमद हुसैन रहमतुल्ला शेख (४१) रा. नागपूर यांनी यासंदर्भात मरडवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. २६ जुलै १९९१ मध्ये ब्राह्मणी येथील नियोजित श्रमिक गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक फत्तेसिंग भालचंद्र मरडवार यांनी राहुल हरीशकुमार ब्रिजलानी रा. नागपूर यांना दस्त क्रमांक ७१२ अन्वये प.ह.नं. १९, मौजा नं.१५२, खसरा क्रमांक २८७ नवीन (३६६) मधील भूखंड क्रमांक २८ व २० ची विक्री केली. त्यानुसार राहुल ब्रिजलानी यांनी १७ ऑगस्ट १९९२ ला सदर प्लॉटचा फेरफार करून सातबारा उतारादेखील तयार केला. यानंतर भूखंड क्रमांक २८ अहमद व मनोज शाहू (रा.गोंदिया) यांनी आममुख्त्यारधारक कय्यूम कादर शेख यांच्यापासून १४ फेब्रुवारी २०११ ला संयुक्तपणे खरेदी केली. मनोज यांनी प्लॉट क्रमांक २० देखील याच दिवशी खरेदी केला. परंतु या प्लॉटचा फेरफार नोंदणी क्रमांक १२२९ अंतर्गत झाल्यानंतरही भूखंड क्रमांक २८ हा मरडवार यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी मिळून ऑनलाईन पद्धतीने भूखंड २८ व मनोज यांचा भूखंड क्रमांक २० चा कुठल्याच प्रकारचा फेरफार न करता सातबारा उतारा आपल्या नावाने करून घेतला. मरडवार हे ले-आऊटचे प्रमुख असताना त्यांनी बिजलानी यांना विकलेला भूखंड आपल्या नावे करून महामार्गात गेलेल्या भूखंडाची रक्कम २०१८ मध्ये ५ लाख ७४ हजार ४८८ रुपये व नंतर २०२१ मध्ये १९ लाख ५३ हजार रुपये स्वतः घेतल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम ४२०, ४६३, ४६७ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Fraud case against former mayor of Kalmeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.