कर्जाचे हप्ते फेडूनही कर्जदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:18+5:302021-07-18T04:07:18+5:30
अनिल रामनारायण तिवारी रा. गुरुदेवनगर यांना घर खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी २ ऑक्टोबर २००२ रोजी वंजारीनगर येथील दिवाण ...

कर्जाचे हप्ते फेडूनही कर्जदाराची फसवणूक
अनिल रामनारायण तिवारी रा. गुरुदेवनगर यांना घर खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी २ ऑक्टोबर २००२ रोजी वंजारीनगर येथील दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते त्यांनी वेळोवेळी दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे भरले. त्यानंतरही कंपनीकडून तिवारी यांना कर्जाच्या हप्त्याचे ३ लाख ४२२९ रुपये भरण्यासाठी तगादा लावण्यात येत होता. त्यांच्याकडे कर्जाचे हप्ते भरल्याच्या पावत्याही होत्या. तरीसुद्धा कंपनीचे अधिकारी दबाव टाकत असल्यामुळे ते त्रस्त झाले होते. त्यांनी कंपनीत चौकशी केली असता कर्जाचे हप्ते घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत त्याची नोंदच केली नसल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी अजनी पोलिसात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी धंतोली येथील मेसर्स दिवाण हाऊसिंग कंपनी, राहुल अरविंद पाटील, नितीन विनोद हरणे, अभिषेक देशमुख, विजय इंगळे, विनोद शर्मा, योगेश राजपूत सर्व रा. अजनी यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
................