शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत चार वर्षांपासून शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:47 IST

१३ व्या वर्षी पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर घरमालक आरोपीने नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न करण्याची तयारी दाखविल्याने त्याच्या प्रेयसीने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल बोंद्रे नामक आरोपीविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून आरोपीचे घूमजाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १३ व्या वर्षी पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर घरमालक आरोपीने नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे तिच्याशी शरीरसंबंध जोडले. आता मात्र दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न करण्याची तयारी दाखविल्याने त्याच्या प्रेयसीने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल बोंद्रे नामक आरोपीविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.मुलीच्या तक्रार अर्जानुसार ती आता १७ वर्षांची असून, तिने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली आहे. तिचे आई-वडील गरीब असून ते मोलमजुरी करतात. चार वर्षांपूर्वी आरोपी राहुल बोंद्रेच्या घरी ते भाड्याने राहत होते. एक दिवस मुलगी आणि तिचा लहान भाऊ दोघेच घरी असताना आरोपी राहुलने तिच्या भावाला दुसऱ्या खोलीत बंद केले आणि तिला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यासोबत शरीरसंंबंध जोडले. यावेळी त्याने भावाला मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध जोडणे सुरू केले. मुलीच्या आई-वडिलांनी घर बदलविले तरी राहुल आणि मुलीचे प्रेमप्रकरण सुरूच राहिले. तो तिला कधी स्वत:च्या घरी तर कधी बांधकामस्थळी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडायचा. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या संबंधाचा बोभाटा झाल्याने तिने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे राहुलच्या आई आणि भावाने तिच्या आई-वडिलांसोबत बोलणी करून या दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने दुसºयाच एका मुलीसोबत लग्न जुळविले. ते माहीत पडल्याने मुलीने राहुलच्या आई आणि भावाशी संपर्क केला. यावेळी त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे मुलीने आज हुडकेश्वर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी राहुलविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.आई आणि भाऊही अडकलाआधी लग्नाची मागणी घालून नंतर शिवीगाळ केल्यामुळे राहुलची आई आणि भाऊ या दोघांविरुद्धही मुलीने तक्रारीत आरोप लावले आहे. त्यावरून पोलिसांनी राहुलसोबतच या दोघांनाही आरोपी केले आहे. सोमवारी सायंकाळी या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार