शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षाच्या बालिकेला घरासमोरुन नेले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:01 IST

घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस परिसरात राहणाऱ्या एका युवकाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन कि.मी. दूर जंगलात नेले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मागावर जाऊन त्या तरुणाला पकडून चोप दिला व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी दिला चोप : पोलिसांच्या केले स्वाधीन

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर( हिंगणा ) : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस परिसरात राहणाऱ्या एका  युवकाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन कि.मी. दूर जंगलात नेले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मागावर जाऊन त्या तरुणाला पकडून चोप दिला व  एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अमरनगर येथे घडली. सुनील कंचरी शाहू (३०) असे या तरुणाचे नाव आहे. मुलीच्या घराशेजारी तो भाड्याने राहतो. ही चार वर्षीय बालिका दुपारी १ वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत होती. तिला चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून एमआयडीसी परिसराला लागून नागलवाडी शिवारातील जंगलात घेऊन गेला. मुलगी कुठे दिसत नसल्याने तिच्या घरच्या मंडळीने शोधाशोध केली. गावातील तरुण गोळा झाले.अमरनगर परिसरात दोन तास गावकऱ्यांनी  शोध घेतला. तेव्हा एका तरुणासोबत एक बालिका जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नागरिकांनी जंगलात जाऊन त्या तरुणाला पकडले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्याला पकडून गावात आणले तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता.   एमआयडीसी पोलिसांनी तिथे पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करीत असून बातमी लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग