दुचाकी चाेरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST2021-05-09T04:09:38+5:302021-05-09T04:09:38+5:30

खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव-पारशिवनी टी-पाॅईंट परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दुचाकी चाेरट्यास ...

Four-wheeler arrested | दुचाकी चाेरटा अटकेत

दुचाकी चाेरटा अटकेत

खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव-पारशिवनी टी-पाॅईंट परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दुचाकी चाेरट्यास अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची माेटरसायकल जप्त करण्यात आली.

संजय विनायक भिमटे (२७, रा. बिना, ता. कामठी) असे अटकेतील चाेरट्याचे नाव आहे. वामन विजय जाधव (३०, रा. खापरखेडा) याने त्याची एमएच-३१/एटी-९१४९ क्रमांकाची माेटरसायकल घरासमाेर उभी ठेवली हाेती. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने ती गुरुवारी (दि. ६) दुपारी चाेरून नेली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी (दि. ७) खापरखेडा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना संजय भिमटे हा या माेटरसायकलने फिरत असल्याचे भानेगाव-पारशिवनी टी-पाॅईंटजवळ आढळून आला. त्यामुळे पाेलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आणि त्याच्याकडून त्याने चाेरून नेलेली माेटरसायकल जप्त केली. त्या माेटरसायकलची किंमत १५ हजार रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, साहेबराव बहाळे, वीरेंद्र नरड, विनाेद काळे, शैलेश यादव, सत्यशील काेठारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Four-wheeler arrested