चार मजली जीर्ण इमारत पाडणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:36 IST2017-08-21T01:36:35+5:302017-08-21T01:36:59+5:30
इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे.

चार मजली जीर्ण इमारत पाडणे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे.
विनोद अग्रवाल यांच्या मालकीची ही इमारत आहे. या इमारतीत भाडेकरू वास्तव्यास होते. परंतु चौथ्या मजल्यावरील भाडेकरू दुसरीकडे राहण्यासाठी गेलेले आहेत. परंतु तळमजल्यावर एक महिला भाडेक रू आपल्या कुटुंबीयासह वास्तव्यास आहे.
महापालिकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकाला झोन कार्यालयाने २००५ मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतरही मोडकळीस आलेला भाग पाडला नाही. त्यामुळे २००७ साली पुन्हा नोटीस बजावण्यात आली. परंतु घरमालक अपिलात जात होते. अपील फेटाळल्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही जीर्ण इमारत न पाडल्याने पथकाने ही इमारत पाडण्याला सुरुवात केली आहे.
तळमजल्यावरील महिलेला घर खाली करण्याचा सल्ला पथकाने दिला होता. परंतु घरमालकासोबत चर्चा सुरू असल्याचे कारण देत तिने घर खाली करण्यास नकार दिल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या इमारतीसंदर्भात परिसरात उलटसुलट चर्चा आहे. जीर्ण इमारतीला तोडण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे. परंतु चार मजली इमारत असल्याने या कारवाईला काही दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. इमारतीचे वरचे तीन मजले पाडण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी सांगितले.