चार सभापतींनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:14 IST2021-03-04T04:14:02+5:302021-03-04T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेचे नवनिर्वाचित जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, अग्निशमन समिती सभापती दीपक चौधरी, विधी समिती ...

चार सभापतींनी पदभार स्वीकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे नवनिर्वाचित जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, अग्निशमन समिती सभापती दीपक चौधरी, विधी समिती सभापती ॲड. मीनाक्षी तेलगोटे व क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील संबंधित झोन सभापती कक्षामध्ये पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर नंदा जिचकार, माजी उपमहापौर मनीषा कोठे, दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेते तथा परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, मावळते अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, मावळते विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.