चाेरट्याने घराजवळून दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:12 IST2021-08-13T04:12:43+5:302021-08-13T04:12:43+5:30

माैदा : घराजवळ उभी ठेवलेली माेटारसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत १५ हजार रुपये आहे. ही घटना माैदा ...

The four snatched the bike from the house | चाेरट्याने घराजवळून दुचाकी पळविली

चाेरट्याने घराजवळून दुचाकी पळविली

माैदा : घराजवळ उभी ठेवलेली माेटारसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत १५ हजार रुपये आहे. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा मार्गावरील वडाेदा येथे घडली.

जयेंद्र रहांगडाले (४८, रा. वडाेदा, ता. कामठी) हे झुल्लर, ता. कामठी शिवारातील कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एजी-१७८८ क्रमांकाची माेटारसायकल घरासमाेर उभी ठेवली हाेती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेेलिसात तक्रार दाखल केली. त्या माेटारसायकलची किंमत १५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रवींद्र बकाल करीत आहेत.

Web Title: The four snatched the bike from the house