शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:09 IST

उपराजधानीतील विविध भागात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात एका ट्रकच्या वाहकाचाही समावेश आहे. यशोधरानगर, जुनी कामठी, अजनी आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.

ठळक मुद्देवाहनचालकांचा निष्काळजीपणायशोधरानगर, अजनी, जुनी कामठी आणि जरीपटक्यात गुन्हे

आॅनलाईन लोकमतनागपूर : उपराजधानीतील विविध भागात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात एका ट्रकच्या वाहकाचाही समावेश आहे. यशोधरानगर, जुनी कामठी, अजनी आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.निष्काळजीपणे ट्रक मागे घेऊन चालकाने ट्रकच्या वाहकाला चिरडले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ११.४५ वाजता हा भीषण अपघात घडला.आरोपी शहजाद शाह शाहिद शाह (रा. डोबीनगर) हा टिपू सुलतान चौकाजवळच्या गोदामात रविवारी दुपारी भंगार खाली करण्यासाठी ट्रक मागे घेत होता.ट्रकवर काम करणारा हबीब नामक इसम चालकाला मागची स्थिती सांगत होता. हबीबकडे दुर्लक्ष करून आरोपी शहजादने वेगात ट्रक मागे घेतला. त्यामुळे ट्रक आणि भिंतीच्या मध्ये हबीब चिरडला गेला. याप्रकरणी मोहम्मद रियाज अब्दुल लतीफ (वय २८) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक शहजाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.जुनी कामठीप्रबुद्धनगर कामठी येथील रहिवासी नसीम अब्दुल जब्बार (वय ३९) रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास कुंभारे कॉम्प्लेक्ससमोरून रस्ता ओलांडत होते. त्यांना एका भरधाव आॅटोचालकाने धडक मारली. त्यामुळे ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नल्लीम नसीम अख्तर (वय १८) यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी आॅटोचालकाचा शोध घेतला जात आहे.अजनीअजनीतील रेल्वे वसाहतीत ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे संजय वसंतराव तालुरकर (वय ५४) यांना रविवारी रात्री १०.२६ वाजता अपघात झाला. तालुरकर त्यांच्या मोटरसायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे रात्री ११.३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अपघाताची नोंद केली.जरीपटकानारीतील रहिवासी विशाल सिद्धार्थ पाटील (वय २६) या तरुणाच्या डिओ दुचाकीला कामठी मार्गावरील विदर्भ डिस्ट्रीलर कंपनीसमोर सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास एका भरधाव वाहनाने जोरदार धडक मारली. त्यामुळे विशाल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी सोमवारी सकाळी ८.४५ वाजता मृत घोषित केले. सुधाकर पुंडलिक गणेर (वय ४२) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर