शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:33 IST

पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला.

ठळक मुद्देपती - पत्नीचा समावेश : माहुली - मनसर मार्गावरील दुर्दैवी घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला. या घटनेत चौघेही बुडाले. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली - मनसर दरम्यानच्या कालव्याच्या मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.कमलेश लालचंद जैन (कवाड) (२७), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन (कवाड) (२४), त्यांची बहीण प्रियंका राजू जैन (कवाड)कवाड (२३) तिघेही रा. महाजनवाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक व कमलेश जैन यांचा मावसभाऊ आशिष नरेंद्र जैन (गोलछा) (२३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आशिष हा कमलेश जैन यांच्याकडे पाहुणा म्हणून आल्याने या सर्वांसोबत पायल राजू जैन (कवाड) (२०, रा. महाजन वाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक) हे पेंच जलाशय परिसरात फिरायला जात होते. कमलेश, अंजली व प्रियंका एका मोटरसायकलवर तर आशिष व पायल स्कूटीवर होते.दरम्यान, कालव्याच्या पुलाजवळ कमलेशची मोटरसायकल स्लीप झाली आणि तिघेही कालव्यात पडले. आशिष स्कूटी थांबवून त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने चौघेही वाहून जाऊ लागले. त्यातच पायलने आरडाओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या हुकूमचंद बिरो यांनी शिवारातील नागरिकांना मदतीला बोलावले. नागरिकांनी अंजली व प्रियंका यांचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या पटगोवारी नदीजवळ काठीने कालव्याच्या कडेला लावले. मात्र, कमलेश व आशिष वाहून गेले. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी कमलेश व आशिषला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.मनसर येथे शोककळाकमलेश व अंजली यांचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. जैन कुटुंबीय मनसर येथील किराणा व्यावसायिक आहेत. ते सर्व आशिष जैन यांच्यासोबत पेंच डॅम परिसरात फिरायला गेले होते. ज्या ठिकाणी कमलेश यांची मोटरसायकल स्लीप झाली, त्या ठिकाणी रेती असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कमलेशची मोटरसायकल कालव्याच्या काठावर अडकली होती. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, दोघे वाहून गेल्याने जैन कुटुंबीयांसह मनसर येथे शोककळा पसरली.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू