राज्यात चार नवे वसतिगृह

By Admin | Updated: March 29, 2015 02:24 IST2015-03-29T02:24:00+5:302015-03-29T02:24:00+5:30

नेहमीच्या अडचणींची दखल घेत महसुली विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी युवकांसाठी वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

Four new hostels in the state | राज्यात चार नवे वसतिगृह

राज्यात चार नवे वसतिगृह

फहीम खान नागपूर
नेहमीच्या अडचणींची दखल घेत महसुली विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी युवकांसाठी वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शासनाला विदर्भातील नागपूर, अमरावतीसह नाशिक, औरंगाबाद व मुंबई येथे १०० विद्यार्थी क्षमता असलेले वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारावर राज्य सरकारने मुंबई वगळता उर्वरित चार ठिकाणी वसतिगृह उभारण्यास मंजुरी दिली असून, प्रत्येक वसतिगृहासाठी चार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात शहरात येतात. परंतु त्यांच्या निवासाची व्यवस्था नसते. परंतु लवकरच नागपूर व अमरावतीसह राज्यातील चार महानगरात वसतिगृहांची सुविधा उपलब्ध होणार आहे. वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी १०० बेडची असून यावर प्रत्येकी चार कोटींचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने नागपुरात येतात. तसेच वाशीम, बुलडाणा, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील युवक अमरावतीला येतात. अशीच परिस्थिती नाशिक व औरंगाबाद शहरांची आहे. येथे येणाऱ्या युवकांना निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Four new hostels in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.