शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

अतिरिक्त आयुक्तांसह मिळाले चार नवीन उपायुक्त

By admin | Updated: April 30, 2017 01:38 IST

शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या.

सीआयडी, आरपीटीएस आणि एसीबीतही नवीन अधीक्षक येणारनागपूर : शहरातील चार पोलीस उपायुक्तांच्या शुक्रवारी नागपुरातून बदल्या झाल्या. शिवाय सीआयडी, आरपीटीएस, एसीबी, लोहमार्ग पोलीस अधीक्षकांच्याही बदल्या झाल्या. त्यांच्या बदल्यात नागपूरला एक अतिरिक्त आयुक्त आणि चार नवीन पोलीस उपायुक्त मिळाले. तर अन्य ठिकाणीसुद्धा नवीन अधिकारी बदलून येणार आहेत.शुक्रवारी शहरातील रंजनकुमार शर्मा, अभिनाश कुमार आणि दीपाली मासिरकर तसेच राकेश कलासागर या चार पोलीस उपायुक्तांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली. त्याबदल्यात धुळ्याहून अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर, धुळे येथूनच पोलीस उपायुक्त म्हणून एस. चैतन्य, नाशिक (मालेगाव) मधून पोलीस उपायुक्त म्हणून राकेश ओला, जालना येथून पोलीस उपायुक्त म्हणून राहुल माकणीकर आणि सांगलीहून पोलीस उपायुक्त म्हणून कृष्णकांत उपाध्याय हे नवीन अधिकारी नागपुरात बदलून येणार आहेत. दोन ते तीन दिवसात हे सर्व नागपुरात रुजू होणार आहेत.नागपुरातून गेलेले उपायुक्त (कंसात बदलीचे ठिकाण)रंजनकुमार शर्मा (अधीक्षक, अहमदनगर) अभिनाश कुमार (अधीक्षक, अमरावती), दीपाली मासिरकर (सहायक महानिरीक्षक, मुंबई) आणि राकेश कलासागर (अधीक्षक, अकोला) या अधिकाऱ्यांसोबतच गुन्हे अण्वेषण विभागाच्या डॉ. आरती सिंह (अधीक्षक, औरंगाबाद), पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळके (अधीक्षक, परभणी), लाचलुचपत विभागाचे अधीक्षक संजय दराडे (अधीक्षक, नाशिक), नागरी हक्क संरक्षण विभागाच्या निर्मलादेवी (अधीक्षक, वर्धा) आणि राज्य महामार्ग विभागाच्या स्वाती भोर यांची आरपीटीएस नागपूरच्या प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे. नागपुरात येणारे अधिकारी (कंसात येथून येणार)अतिरिक्त आयुक्त एस. दिघावकर (धुळे), उपायुक्त एस. चैतन्य (धुळे), कृष्णकांत उपाध्याय (सांगली), राहूल माकणीकर (जालना), राकेश ओला (मालेगाव) हे अधिकारी अनुक्रमे नागपुरात येणार आहेत. याशिवाय पी. आर. पाटील पुण्याहून नागपुरात नागरी हक्क संरक्षण विभागात अधीक्षक, नाशिकचे उपायुक्त व्ही. जी. पाटील गुन्हे अण्वेषण विभागात अधीक्षक म्हणून नागपुरात रुजू होणार आहेत.(प्रतिनिधी) एस. दिघावकर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागधुळ्यात आतापर्यंत राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळणारे एस. दिघावकर यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर मुंबईत काही काळ नोकरी केली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९८९ ला ते उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना येथे सेवा दिल्यानंतर त्यांना २००१ मध्ये आयपीएस कॅडर मिळाला. उस्मानाबाद, बुलडाणा येथे अधीक्षक तर सोलापुरात उपायुक्त म्हणून सेवा दिली. त्यानंतर ते धुळे येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ६ ची जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त आयुक्त म्हणून सरकारने नागपुरात नियुक्ती दिली आहे. एस. चैतन्य धुळ्यात आतापर्यंत पोलीस अधीक्षकांची जबाबदारी सांभाळणारे एस. चैतन्य मूळचे तेलंगणातील रहिवासी असून, त्यांनी बी.टेक. केले आहे. पोलीस दलाचे आकर्षण असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि भारतीय पोलीस दलात त्यांची निवड झाली. २०११ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर, इचलकरंजी येथे सेवा दिल्यानंतर, ११ महिन्यांपूर्वी ते धुळ्याचे अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी येथील दारू विक्रेते आणि अवैध धंदेवाल्यांना लगाम लावतानाच हप्तेखोर पोलिसांवरही बदलीचा बडगा उगारला. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.राहुल माकणीकरगेल्या तीन वर्षांपासून जालना येथे माकणीकर कार्यरत आहे. २००८ ते २०१० या कालावधीत ते नंदूरबार तर, २०१० ते २०१३ पर्यंत परभणी, तेथून २०१५ पर्यंत फलटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१५ ते मार्च २०१७ पर्यंत ते जालना येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता नागपुरात ते पोलीस पोलीस उपायुक्त म्हणून सेवा देणार आहेत.