शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे चार स्टेशन मंगळवारपासून प्रवासी सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 23:18 IST

metro stations मंगळवारपासून महामेट्रोचे चार स्टेशन्स प्रवासी सेवेत असणार आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेसनगर, छत्रपती चौक व उज्ज्वलनगर आणि ॲक्वा लाईन मार्गिकेवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंगळवारपासून महामेट्रोचे चार स्टेशन्स प्रवासी सेवेत असणार आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेसनगर, छत्रपती चौक व उज्ज्वलनगर आणि ॲक्वा लाईन मार्गिकेवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहेत.

या चारही मेट्रो स्टेशन्सला काहीच दिवसापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रवासी सेवा सुरू करण्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. हे चारही मेट्रो स्टेशन सुरू झाल्याने रिच - १ आणि रिच - ३ ऑरेंज आणि ॲक्वा लाईन मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेकरिता उपलब्ध राहणार असून, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे एकूण २२ मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता कार्यरत असतील. सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोसेवा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत व सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर दरम्यान मेट्रोसेवा सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत उपलब्ध असेल.

‘ब्रेक दी चैन’ अंतर्गत मेट्रोच्या प्रवासी सेवांत बदल

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या ‘ब्रेक दी चैन’ टाळेबंदीमुळे महामेट्रोने आपल्या प्रवासी सेवांमध्ये बदल केला आहे. त्याआनुषंगाने ऑरेंज आणि ऍक्वा लाइन मार्गिकेवर प्रवासी सेवा दर १५ मिनिटांच्या ऐवजी दर ३० मिनिटांनी सोमवार ते शुक्रवारपर्यंत उपलब्ध असतील, तर शनिवार आणि रविवारला या प्रवासी सेवा दर ३० मिनिटांच्या ऐवजी १ तासाने उपलब्ध असतील.

महा मेट्रो तर्फे ५० टक्के यात्रि क्षमता प्रमाणे ऑरेंज आणि ऍक्वा लाइन वर मेट्रो सेवा सुरु आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षासंबंधी आवश्यक उपाययोजना प्रभावी पणे लागू आहेत. विषम परिस्थितीमध्ये प्रवासींकरिता मेट्रो परिवहन सेवा उपयुक्त असून, मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहे व मेट्रो स्टेशन व ट्रेनमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात आहे. प्रवासानंतर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक स्टेशनला सॅनिटाईज करण्याची व्यवस्था आहे. प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. उपकरणांना स्पर्श कमी व्हावा याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर