मेट्रोचे चार स्टेशन आजपासून प्रवासी सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:08 IST2021-04-06T04:08:46+5:302021-04-06T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारपासून महामेट्रोचे चार स्टेशन्स प्रवासी सेवेत असणार आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेसनगर, छत्रपती चौक ...

मेट्रोचे चार स्टेशन आजपासून प्रवासी सेवेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारपासून महामेट्रोचे चार स्टेशन्स प्रवासी सेवेत असणार आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवरील काँग्रेसनगर, छत्रपती चौक व उज्ज्वलनगर आणि ॲक्वा लाईन मार्गिकेवरील धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहेत.
या चारही मेट्रो स्टेशन्सला काहीच दिवसापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रवासी सेवा सुरू करण्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. हे चारही मेट्रो स्टेशन सुरू झाल्याने रिच - १ आणि रिच - ३ ऑरेंज आणि ॲक्वा लाईन मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेकरिता उपलब्ध राहणार असून, नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे एकूण २२ मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता कार्यरत असतील. सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोसेवा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत व सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर दरम्यान मेट्रोसेवा सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत उपलब्ध असेल.
...............