चाेरट्याने बांधकाम साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST2021-08-27T04:11:52+5:302021-08-27T04:11:52+5:30

खापरखेडा : बांधकामस्थळी ठेवलेल्या साहित्यापैकी चाेरट्याने काही साहित्य चाेरून नेले. या साहित्याची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना ...

The four looted construction materials | चाेरट्याने बांधकाम साहित्य पळविले

चाेरट्याने बांधकाम साहित्य पळविले

खापरखेडा : बांधकामस्थळी ठेवलेल्या साहित्यापैकी चाेरट्याने काही साहित्य चाेरून नेले. या साहित्याची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा (नवीन) येथे मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री घडली.

स्वप्निल चुडामण उरमाटे (३४, रा. परमानंद ले-आऊट, खापरखेडा, ता. सावनेर) यांनी त्यांच्या नवीन नांदा (ता. कामठी) येथील भूखंडावर घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवले आहे. तिथे चाैकीदार नसल्याचे पाहून चाेरट्याने २० हजार रुपये किमतीच्या ६० नग लाेखंडी प्लेट चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच त्यांनी बुधवारी (दि. २५) पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सूर्यभान जळते करीत आहेत.

Web Title: The four looted construction materials